शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

बुलेट ट्रेनवरून श्रेष्ठींकडून भाजप नगरसेवकांची कानउघाडणी, प्रस्तावावरून वरातीमागून घोडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 00:54 IST

Bullet Train : ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावांतून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे.

ठाणे : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव अखेर सत्ताधारी शिवसेनेने दप्तरी दाखल केला आहे. परंतु, महासभेला उपस्थित असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी विरोध करण्याचे सोडून मौन धारण केले होते. आता पक्षश्रेष्ठींनी कानउघाडणी केल्यानंतर वरातीमागून घोडे नाचवून पक्षाच्या स्थानिक नगरसेवकांना शिवसेनेने राजकीय आकसापोटी हा प्रस्ताव दप्तरी दाखल केल्याचा साक्षात्कार झाला आहे.ठाणे महापालिका क्षेत्रातील शीळ, डवले, पडले, देसाई, आगासन, बेतवडे आणि म्हातार्डी या गावांतून बुलेट ट्रेनचा मार्ग जाणार असून म्हातार्डी येथे बुलेट ट्रेनचे स्थानक उभारले जाणार आहे. यात महापालिकेच्या मालकीची शीळ भागातील ३८४९ चौरस मीटर इतकी जागा बाधित होणार आहे. ती एनएचएसआरसीएलला देऊन त्याबदल्यात सहा कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये मोबदला घेण्याचा ठराव चौथ्यांदा महासभेसमोर आला असता महापौरांनी तो दप्तरी दाखल करून मोदींच्या स्वप्नास सुरुंग लावला. विशेष म्हणजे भाजपच्या संजय वाघुले वगळता इतर नगरसेवकांनी चर्चेत सहभागी न होता मौन बाळगले होते.भाजपच्या या भूमिकेबाबतही आता शंका उपस्थित केली जात आहे. मुळातच मागील चार महासभांस गैरहजर राहणारे पक्षाचे नगरसेवक खास या प्रस्तावाच्या बाजूने आपली मते मांडण्यासाठी हजर झाले होते. परंतु, महासभेत वाघुले वगळता इतरांनी भूमिका न मांडता मौन बाळगणे पसंत केले.

विरोध म्हणजे शिवसेनेच्या अकलेचे दिवाळेबुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा देण्यास नकार देणाऱ्या ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या ‘अकलेचे दिवाळे’ निघाले आहे. एकीकडे केंद्र सरकारकडे मदत मागायची आणि दुसरीकडे केंद्राच्या प्रकल्पांना मोठ्या अविर्भावात परवानगी नाकारायची, या प्रकारातून शिवसेना नेत्यांचे भोंगळ धोरण स्पष्ट होत आहे. विकास प्रकल्पांना विरोध करून आपण मुंबई-ठाण्याला कोठे नेत आहोत, याचे शिवसेनेच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे.         - निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष, भाजप

बुलेट ट्रेनला जागा देण्याच्या प्रस्तावावर वेबिनार महासभेत चर्चाही झाली नाही. मात्र, संबंधित प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याच्या प्रस्तावाला भाजपचा पाठिंबा असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांचे वक्तव्य खोटे आहे.- संजय वाघुले, गटनेते, भाजप

बुलेट ट्रेनचा लाभ होणार, व्यापार उद्योग वाढीस लागणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनींचे भाव वाढतील. हा प्रस्ताव दप्तरी दाखल करून ठाणेकरांचे हित साधले की अहित, याचा विचार महापौरांनी केला पाहिजे. ही केवळ राजकीय कृती आहे.- संदीप लेले, नगरसेवक, भाजप 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनthaneठाणे