शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या कृतीच्या विरोधात भाजपाचे ठाण्यात निषेध आंदोलन

By अजित मांडके | Updated: June 19, 2024 17:15 IST

महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हा शासकीय विश्रामगृहाजवळ आपला निषेध नोंदवला

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेतल्याचा निषेधार्थ बुधवारी ठाणे शहरात भाजप महिला मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी नाना पटोले यांचा फोटो फाडून महिलांनी आपला रोष व्यक्त केला. तसेच पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्यांची माफी मागावी अशी मागणी ही यावेळी महिलांकडून लावून धरण्यात आली.

भाजपा महिला मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्हा शासकीय विश्रामगृहाजवळ आपला निषेध नोंदवला. यावेळी पटोले यांचे फोटो फाडण्यात आले. काँग्रेस पक्ष हा कायमच जातीय राजकारण करण्यातच अग्रेसर राहिला आहे. दोन पाय आणि दोन हात असलेले नाना पटोले स्वतः हे करू शकले नाहीत का असा सवाल करत या संदर्भात त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी ठाण्यातील भाजप महिला मोर्चा तर्फे करण्यात आली.

जोपर्यंत पटोले ओबीसी समाजाची माफी मागत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीचा निषेध नोंदवत राहणार अशी प्रतिक्रिया ठाण्यातील भाजपच्या वृषाली वाघुले यांनी दिली. अशा पद्धतीने कार्यकर्त्याला वागवणाऱ्या माणसाला त्या पदावर बसण्याचा अधिकार देखील नाही. त्यामुळे नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी केली.

टॅग्स :thaneठाणेNana Patoleनाना पटोलेBJPभाजपा