शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात बायोजिओग्राफी, नॉलेज पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 01:40 IST

पाच कोटींचा खर्च । महासभेच्या मंजुरीची प्रतीक्षा, गुरुवारी प्रस्ताव येणार पटलावर

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत थीम पार्क आणि बॉलिवूड पार्क प्रकरण ताजे असताना आता पालिकेने घोडबंदर भागात आरक्षित भूखंडावर बायो जिओग्राफी व नॉलेज पार्क उभारण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी चार कोटी ९३ लाख ३५ हजार ५१७ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या २० फेब्रुवारीच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.

महापालिकेत यापूर्वी थीम पार्क आणि बॉलिवूड पार्कचे प्रकरण चांगलेच गाजले होते. थीम पार्कचे काम पूर्ण झालेले आहे. मात्र, अर्धवट असलेल्या बॉलिवूड पार्कच्या कामाचे पैसेही ठेकेदाराला अदा केले आहेत. त्यामुळे हे काम बंद करण्याची मागणी महासभेत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी लावून धरली होती. ही दोन्ही प्रकरणे आजही ताजी असताना पालिकेने घोडबंदर भागातील वाघबीळ येथे हिल स्प्रिंग इमारतीसमोरील उद्यानाच्या आरक्षित भूखंडावर हे बायो जिओग्राफी व नॉलेज पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.या असणार सुविधा या प्रस्तावानुसार या ठिकाणी नॉलेज पार्क, प्लॅनेट झोन, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी झोन, लाफिंग झोन (अंब्रेला), चेस झोन, क्विझ झोन, स्पीकर कॉर्नर, योगा एरिया, वॉटर फाउंटन, नो युवर मदरलॅण्ड, स्टोरी रीडिंग एरिया, बर्ड्स अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल झोन, अ‍ॅक्युप्रेशर वॉकिंग ट्रॅक, सोलर पार्क, सेवन वंडर्स आॅफ द वर्ल्ड, चिल्ड्रन प्ले झोन, रेन्बो गार्डन, नॉलेज प्लॅटफॉर्म, स्पोर्ट्स अ‍ॅण्ड जिम इक्विपमेंट, शौचालय, पाणपोई, सेवा कक्ष, फूड काउंटर, पाथ वे, सिंचनव्यवस्था, प्रवेशद्वार, लॅण्डस्केप, संरक्षक भिंत, कमानी, फर्निचर व इतर कामांचा यात समावेश असणार आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिक व लहान मुलांना याचा फायदा होणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. या कामासाठी चार कोटी ९३ लाख ३५ हजार ५१७ रुपये खर्च केला जाणार आहे.निगा-देखभाल कोण करणारयापूर्वीदेखील अनेक छोटीमोठी उद्याने पालिकेने विकसित केली आहेत. त्यावर लाखोंचा किंवा कोट्यवधींचा खर्च करूनही त्यांची अवस्था काय झाली, हे पालिकेला नव्याने सांगायची गरज नाही. निगा-देखभाल कोण करणार, हा यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे हे उद्यान तरी व्यवस्थित राहील का, हा सवाल यानिमित्ताने करण्यात येत आहे.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका