शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या बिनू वर्गीसचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 21:52 IST

मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असलेला बिनू वर्गीस याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयात त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज ठाणे न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे.

ठळक मुद्दे उपायुक्त केळकर यांच्याकडून घेतले पैसेमहिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबई तसेच ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह ठाणे नगर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल असलेला बिनू वर्गीस याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हयात त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज ठाणे न्यायालयाने बुधवारी फेटाळला आहे. त्यामुळे त्याला आता कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.बिनू तसेच कथित महिला पत्रकार नाझीया सय्यद आणि उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरुद्ध विनयभांची तक्रार करणारी अन्य एक महिला यांनी संगनमताने ठाण्यातील बाळकूम येथील ठाणे महापालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात १५ मे २०२१ ते १ जून २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास हा खंडणी उकळण्याचा प्रकार केला होता. उपायुक्त केळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ‘या रुग्णालयाच्या एका परिचारिकेचा लैंगिक छळ केळकर यांच्याकडून सुरु असल्याचा मजकूर एका व्हॉटसअ‍ॅप ग्रृपवर टाकण्यात आला. त्यानंतर बदनामी करण्याची भीती दाखवून त्यांच्याकडे पाच लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्यातील तीन लाख रुपये हे १ जून २०२१ रोजी ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयात केळकर यांच्या कॅबिनमध्येच घेतल्याचा आरोप आहे. विनयभंगाची तक्रारही बनावट असून उलट बदनामी करण्याची भीती दाखवून आपल्याकडून तीन लाखांची खंडणी उकळल्याची तक्रार केळकर यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात ४ आॅगस्ट रोजी केली. त्यानंतर १२ आॅगस्ट रोजी कापूरबावडी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अटक वॉरन्ट काढले. त्याआधीच त्याने १० आॅगस्ट रोजी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. त्यावर २४ आॅगस्ट रोजी युक्तीवाद झाल्यानंतर २५ आॅगस्ट रोजी न्या. गोंधळेकर यांनी बिनूचा जामीन अर्ज फेटाळला. या गुन्हयातील काही पुरावे तसेच तीन लाखांची रोकडही बिनूकडे असल्यामुळे ती जप्त करायची आहे. असे अनेक मुद्दे पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर यांनी न्यायालयात मांडले. ते सर्व ग्राहय धरुन ठाणे न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी