शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

निकृष्ट कामे करून लाटली कोट्यवधींची बिले; ग्रामीण रस्ते विकास संस्थेचा प्रताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 03:21 IST

तक्रारींना केराची टोपली 

नारायण जाधव ठाणे : पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाचे आयुष्य पाच वर्षे असूनही अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनेक ठेकेदार निकृष्ट कामे करून दरवर्षी सरकारच्या कोट्यवधींच्या निधीची लूट कोकणात करत आहेत. यात बहुसंख्य कामे पाच वर्षांत एकदा न काढता ती वारंवार सुरू आहेत.

याबाबत, काही ठेकेदारांसह स्थानिकांनी तक्रारी करूनही त्यांची दखल न घेता ठाणे, अलिबाग आणि परीक्षण करणाºया पुणे येथील अधिकाºयांनी आपसात संगनमत करून या सार्वजनिक लुटीला उघडउघड पाठिंबा दिला आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत कोकणात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत झालेल्या कामांचे मेजरमेंट बुक तपासून त्रयस्थ संस्थेमार्फत आॅडिट केल्यास कोट्यवधींची लूट चव्हाट्यावर येण्यास मदत होईल.

निकृष्ट कामांचे उदाहरण द्यायचे झाल्यास सरफळेवाडी ते वडाचीवाडी हा २३०० मीटरचा रस्ता चांगला असूनही ठेकेदाराने डब्ल्यूबीएमचे चार थर टाकण्याचे बंधन असतानाही थेट बीबीएम करून १८ लाखांचे बिल लाटले होते. याबाबत, स्थानिकांसह पत्रकारांनी आवाज उठवूनही त्याची दखल घेण्यात आली नव्हती. अशाच प्रकारे पेण तालुक्यातील बोरगाव ते धनगरमाळ या रस्त्याच्या दर्जाच्या गुणवत्तेच्या चौकशीची मागणी तेथील भाजपचे कार्यकर्ते नागेश जगताप यांनी करूनदेखील अलिबाग येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी तिची दखल घेतली नाही. पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील १८ रस्त्यांच्या कामांचा दर्जा तपासण्यासाठी साइट व्हिजिट करण्यात आली. परंतु, यातून रोहा तालुक्यातील मुचणे रस्त्याला हेतुपुरस्सर वगळण्यात आले.रत्नागिरीत लाटले सात कोटीरत्नागिरी जिल्ह्यातील दापोली सर्कलमध्ये येणाºया खेड तालुक्यातील बेरळ-बोरज-कोंडिवली या ११ किमी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत करण्यात आले. मात्र, या कामाची तपासणी न करताच सात कोटींचे बिल देण्यात आले. विशेष म्हणजे या रस्त्याच्या बांधकामात समाविष्ट असणाºया ७२ मोºयांचे काम हे फाउंडेशन न करताच करण्यात आले. शिवाय, या रस्त्याच्या कामात हाताने डांबर मारण्यात आले. यामुळे या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होऊन त्याचा बराचसा भाग पावसाळ्यात वाहून गेला.