शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीला किक मारताच बाईकस्वार थेट बाईकसह फोटो स्टुडिओत; VIDEO तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 16:51 IST

भिवंडीत घडलेला प्रकार सोशल मीडियावर व्हायरल; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

नितिन पंडीत

भिवंडी: रस्त्यावर उभी असलेल्या दुचाकीला तरुणाने किक मारून दुचाकीचा गियर टाकला आणि दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने काही सेकंदात दुचाकीस्वार बाईकसह थेट फोटो स्टुडिओत घुसल्याची घटना गुरुवारी वंजारपट्टी नाका परिसरात घडली आहे. विषेश म्हणजे या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला असून शुक्रवारी हा व्हिडीओ शहरात प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान अचानक घडलेल्या या अपघातातून फोटो स्टुडिओमधील एक फोटोग्राफर सुदैवाने थोडक्यात बचावला आहे. 

शहरातील वंजारपट्टी भागात पटेल नगरमध्ये हर्षित डिजिटल फोटो स्टुडिओ आहे.  या ठिकाणी एक तरुण दुचाकीवर कामानिमित्ताने आला होता. त्यावेळी याच फोटो स्टुडिओ समोरच्या रस्त्यावर त्याने दुचाकी उभी केली होती. काही वेळाने काम आटपून पुन्हा दुचाकीस्वार दुचाकी बसला आणि दुचाकीला किक मारून दुचाकीचा गियर टाकताच नियंत्रण सुटलेली बाईक दुचाकीस्वारासह थेट फोटो स्टुडिओत घुसली. त्यावेळी फोटो स्टुडिओत काम करणारा एक फोटोग्राफर काऊंटरवर मोबाईल बघत उभा असतानाच अचानक बाईक समोर आला होता. बाईकचा वेग अधिक वाढल्याने दुचाकीस्वाराने ब्रेक दाबण्याच्या प्रयत्नात एक्सलेटर जोरात फिरवल्याने बाईकवरील ताबा सुटला होता. या अचानक घडलेल्या अपघातात स्टुडिओमधील डिजिटल फ्लॅश व इतर साहित्याचे नुकसान झाले.   

विशेष म्हणजे जेवढ्या वेगाने हा अपघात झाला तेवढ्याच वेगाने समाज माध्यमांवर अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले. मात्र या घटनेनंतर बाईकस्वराने माफी मागून स्टुडिओमधील झालेले नुकसान भरपाईची हमी दिल्याने स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार फोटो स्टुडिओच्या मालकाने दिली नसल्याचे समजते.