शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...

By अजित मांडके | Updated: December 24, 2025 07:45 IST

Thane Election Politics: भाजप अधिक आक्रमक : महाविकास आघाडीतील पक्षांना करावी लागेल तडजोड, स्वब‌ळावर धावायची सोडा चालायचीही त्यांच्यात दिसत नाही ताकद, राज्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतराचा ठाणे ठरला केंद्रबिंदू 

- अजित मांडकेलोकमत न्यूज नेटवर्क  ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याच्या आधीच महायुतीची घोषणा झाली. परंतु, त्याचे पडसाद आता ठाण्यात उमटले आहेत. भाजपमध्ये अनेक नाराजांनी थेट काम न करण्याचा इशारा देत युती तोडण्याची भूमिका घेतली. शिंदेसेनेतही काही नाराज असले, तरी ते आपली नाराजी जाहीर करीत नाहीत. मुंबईत शिंदेसेनेने जास्त जागांवर दावा करू नये, याकरिता युतीला विरोध करून शिंदेसेनेचे नाक दाबण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. महाविकास आघाडीतील पक्ष एकमेकांना धरून आहेत. कारण, त्यांची ताकद बरीच क्षीण झाली असून, स्वबळावर धावायची सोडा चालायचीही ताकद दिसत नाही.राज्यात तीन वर्षांपूर्वी झालेल्या सत्तांतराचा ठाणे हा केंद्रबिंदू ठरला. त्यामुळेच ठाणे महापालिका निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे नाक मानले जात आहे. आपला गड ताब्यात ठेवण्यासाठी शिंदेसेना सज्ज झाली आहे. 

ठाणे महापालिकेची मुदत ५ मार्च २०२२ रोजी सुंपष्टात आली. तेव्हापासून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायप्रविष्ट होत्या. त्यामुळे महापालिकेवर मागील तीन वर्षे प्रशासकीय राजवट होती. परंतु आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने प्रशासकीय राजवटही संपुष्टात येणार आहे.

आता काय आहेत राजकीय समीकरणे? सध्या ठाण्यात शिंदेसेनेचा वरचष्मा दिसत आहे. शिंदेसेनेकडे ७९, भाजपकडे २४, उद्धवसेनेकडे ०३, कॉंग्रेसकडे ०३, मनसे ०, राष्ट्रवादी (शरद पवार) १३ आणि राष्ट्रवादी (अजित पवार) ११ चे संख्याबळ आहे. त्यामुळे २०१७ च्या तुलनेत यंदा राजकीय समीकरणे ही बदललेली दिसत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे ठाण्यातील समीकरणे बदलतील का, यादृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे. तर राष्ट्रवादीने (शरद पवार) कळवा, मुंब्रा येथे अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. तर काँग्रेसलाही मुंब्रा येथे उमेदवारी हवी असल्याने त्यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे.

कोणते मुद्दे ठरतील निर्णायक? शहरातील पाणी समस्या सुटू शकलेली नाही, धरणात पुरेसे पाणी असूनही ठाणेकरांना आजही टँकरवर अवलंबून राहावे लागते. खास करून घोडबंदर रोड परिसरातील सोसाट्यांना टँकरचा भूर्दंड सहन करावा लागत आहे.ठाणे शहरात  वाहतूककोंडी ही पाचवीलाच पूजल्याचे चित्र आहे. शहरात एकही दिवस असा गेला नाही की वाहतूककोंडी झाली नाही. या वाहतूक कोंडीने ठाणेकर त्रासून गेले आहेत. हा मुद्दा प्रचारात केंद्रस्थानी असेल. तसेच शहरात कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. सत्ताधाऱ्यांकडून क्लस्टरचा गाजावाजा केला जात असताना, त्या आघाडीवर फारसे काही न झाल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. निवडणुकीत हा मुद्दाही गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वाढलेल्या मतदारसंख्येचा लाभ कुणाला हाेणार?  २०१७ मधील महपालिका निवडणुकीत १२ लाख २८ हजार ६०६ मतदार होते. आता मतदारांच्या संख्येत ४ लाखांची वाढ झाली आहे. आता मतदारांची संख्या १६,४९,८६७ एवढी झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या चार लाख मतदारांचा लाभ कोणाला होणार हे पाहणे महत्वाचे आहे. या मतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी शिंदेसेना व भाजपमध्ये सध्या जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यात काेण यशस्वी हाेते हे १६ जानेवारीला निकालानंतर हे स्पष्ट होईल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Big Game Plan: BJP Suppresses Shinde Sena in Thane!

Web Summary : BJP strategically pressures Shinde Sena in Thane, aiming to limit their Mumbai seat demands. With increased voters, Thane faces key issues like water scarcity and traffic congestion ahead of upcoming elections.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक २०२६BMC Electionsमुंबई महापालिका निवडणूक २०२६Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेना