मोठी दहीहंडी दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून फोडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By अजित मांडके | Published: August 19, 2022 03:09 PM2022-08-19T15:09:57+5:302022-08-19T15:14:08+5:30

गोविंदा थर लावून हंडी फोडतात मात्र आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला.

big Dahihandi was broken a month and a half ago with 50 thar Chief Minister eknath Shinde slams Uddhav Thackeray | मोठी दहीहंडी दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून फोडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मोठी दहीहंडी दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून फोडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

googlenewsNext

ठाणे : 

गोविंदा थर लावून हंडी फोडतात मात्र आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झालं असून असेच थर यापुढे वाढत जातील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यापुढे उत्सव जोरात साजरे करा पण काळजी घेऊन करा, असे आवाहनही त्यांनी केले.

"आनंद दिघेंच्या बहिणीनं माझ्याजवळ बोलून दाखवलं ते खरं झालं...", CM शिंदेंचा दहीहंडी उत्सवात खुलासा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका उत्सवात जोरदार टोलेबाजी केली. स्टेजवर येताच यावेळचा गोविंदा जोरात आहे ना?, अशी साद त्यांनी गोविंदाला घातली. शिंदे पुढे म्हणाले, गोविंदाचा विमा पण दिला, सरनाईक आणि लोकप्रतिनिधींनी  खेळाच्या दर्जाची मागणी केली होत ती मान्य करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र गोविंदाचाही आहे. अपघात होऊ नये याची काळजी घ्या. प्रो कबडी प्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल आणि नोकरीत ५ टक्के आरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टेंभी नाका म्हणजे गोविंदाची पांढरी आहे. आनंद दिघेंनी सुरू केलेला उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. धर्म आणि संस्कृती जोपासण्याचे काम दिघे यांनी केले. आंनद दिघे बोलले होते की ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्यांच्या बहिनीने माझ्याजवळ दिघेसाहेबांची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांची एवढी दूरदृष्टी होती आणि दिघे यांचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. या उत्सवात सहाभागी झालो हे सर्वसामान्याचं सरकार आहे. उत्सव काळजी घेऊन साजरी करा. साथीचे आजार अजून गेले नाहीत काळजी घ्या. गणपती उत्सव देखील मोठया उत्सवात साजरे झाले पाहिजे, दोन वर्षे थांबलो. हा सण सर्वात मोठा सण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने साधला मराठीत संवाद..
टेंभी नाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंदशी संपूर्ण मराठीत संवाद साधला. टेंभी नाक्याची दिघे साहेबांची दहीहंडी ही सर्वात मोठी आणि मनाची हंडी असल्याचे सांगत मला या उत्सवात बोलावल्याने मला अभिमान असल्याचे तिने सांगितले. या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावल्याने आपल्या सोबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने याचा विशेष आनंद असल्याचे तिने सांगीतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरळ स्टेजवर न जाता त्यांनी गोविंदशीही संवाद साधला.

Web Title: big Dahihandi was broken a month and a half ago with 50 thar Chief Minister eknath Shinde slams Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.