शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यास भोसले हत्याप्रकरणी अटक, चार दिवसांची पोलिस कोठडी; एकूण सात जण जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 12:27 IST

१४ फेब्रुवारीला क्षुल्लक वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख कैलास धोत्रे, त्याचा मुलगा देवा व इतर साथीदारांनी संकेत भोसले या अल्पवयीन युवकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाला होता.

भिवंडी : संकेत भोसले हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवसेनेच्या शिंदे गटाचा उपशहरप्रमुख कैलास धोत्रे याच्यासह दोघा आरोपींना बुधवारी रात्री उशिरा शहर पोलिसांनी अटक केली. तर अन्य एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याने अटक केलेल्या आरोपींची संख्या सातवर पोहोचली आहे.

१४ फेब्रुवारीला क्षुल्लक वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर शिवसेना शिंदे गटाचे उपशहरप्रमुख कैलास धोत्रे, त्याचा मुलगा देवा व इतर साथीदारांनी संकेत भोसले या अल्पवयीन युवकाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण केल्याने तो जखमी झाला होता. या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल होते. उपचारादरम्यान संकेत याचा मृत्यू झाला. त्या नंतर  पोलिसांनी संकेतला मारहाण करून हत्या केल्याच्या गुन्ह्यात कैलास धोत्रेचे साथीदार करण लष्कर, दिनेश मोरे व चंदन गौड यांना अटक केली होती.

पोलिसांची वेगवेगळी पथके

हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलिसांनी या गुन्ह्यातील फरार आरोपींच्या शोधासाठी स्थापन केलेल्या पोलिस पथकाने बुधवारी रात्री उशिरा मुख्य आरोपी कैलास धोत्रे, आकाश जाधव, विशाल साबळे यांना अटक केली. तर भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने ओम लोंढे याला बेड्या ठोकल्या.

 दरम्यान, आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत संकेत याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांसह स्थानिकांनी घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी गांभीर्य ओळखून या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्यासाठी वेगवेगळी पथके बनवली होती.

 गुरुवारी दुपारी कैलास धोत्रे, आकाश, विशाल यांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी वऱ्हाळदेवी नगर, धामणकर नाका, न्यायालय व सबजेल परिसरात बंदोबस्त ठेवला होता.