शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत मोहर्रम निमीत्ताने २९ पंजे तर ६८ ताजीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:39 IST

भिवंडी : मोहर्रम निमीत्ताने शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यात २९ पंजे तर ६८ ताजीयाची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी काही ताजीया आणि पंजांचे आज रोजी मिरवणूक काढून त्यांना ठंडे(विसर्जीत)करण्यात आले. ताजीया स्थापन केलेल्या काही ठिकाणी काल रात्रीपासून ढोल वाजविले जात होते. तर काही ठिकाणी ‘वाज’चे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.दरवर्षीप्रमाणे शहरातील भोईवाडा ...

ठळक मुद्देमोहर्रम निमीत्ताने २९ पंजे तर ६८ ताजीयाची स्थापनासकाळी हैदरमजीद ते कोतवाल शा दर्गा मिरवणूकसायंकाळी गैबीनगर ते चव्हाण कॉलनी मिरवणूक

भिवंडी: मोहर्रम निमीत्ताने शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यात २९ पंजे तर ६८ ताजीयाची स्थापना करण्यात आली होती. त्यापैकी काही ताजीया आणि पंजांचे आज रोजी मिरवणूक काढून त्यांना ठंडे(विसर्जीत)करण्यात आले. ताजीया स्थापन केलेल्या काही ठिकाणी काल रात्रीपासून ढोल वाजविले जात होते. तर काही ठिकाणी ‘वाज’चे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.दरवर्षीप्रमाणे शहरातील भोईवाडा भागातील हैदर मजीदमध्ये सकाळपासून धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. या कार्यक्रमासाठी शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. दुपारी हैदर मजीद ते दर्गारोडवरील कोतवाल शा दर्गापर्यंत मिरवणूक काढून ही मिरवणूक विसर्जीत करण्यात आली. या मिरवणूकीसाठी जमलेल्या कुटूंबांमुळे या परिसरांस जत्रेचे स्वरूप आले होते. करमणूकीच्या साधनांबरोबर खेळण्यांची दुकाने देखील येथे थाटलेली होती. आज शुक्र वार असल्याने शहरातील पॉवरलूम उद्योग बंद होते. त्यामुळे कामगार कुटूंबांनी आजचा दिवस आपल्या कुटूंबासह येथे आनंदात घालविला.दुपारनंतर शांतीनगर भागातील पिराणीपाडा येथील इराणी बांधवांनी मोहर्रम निमीत्ताने मिरवणूक काढून आपल्या अंगावर मारून व जखमा करून दु:ख व्यक्त केले. तर गैबीनगर येथुन सायंकाळी निघालेला मोठा ताजीयाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.ही ताजीयाची मिरवणूक व इराणी बांधवांची मिरवणूक एस.टी.स्थानकासमोरील चव्हाण कॉलनीत समाप्त होऊन तेथे पंजा व ताजीया थंड करण्यात आले. शहरात मोहर्रम निमीत्ताने विविध ठिकाणी ताजीयाच्या मिरवणूका काढण्यात आाल्या होत्या. शहरात मोठ्या आनंदात व उत्साहात गणेशोत्सव सुरू असताना दुसऱ्या बाजूने मोहरम निमीत्ताने निघालेल्या मिरवणूका शांततापुर्ण वातावरणात संपन्न झाल्या. शहरात कोठेही अनुचित प्रकार घडू नये या साठी शहरात चोख पोलीस बंदोवस्त ठेवला होता.

टॅग्स :BhiwandiभिवंडीFairजत्रा