शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Bhiwandi: भिवंडीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला निरोप देताना पोलीस ठाण्यातील पोलीस गहिवरले

By नितीन पंडित | Updated: October 27, 2023 19:54 IST

Police News: नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांची मीरा भायंदर येथे सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती झाल्याने गुरुवारी नारपोली पोलीस ठाण्यात त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

- नितीन पंडितभिवंडी - नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांची मीरा भायंदर येथे सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती झाल्याने गुरुवारी नारपोली पोलीस ठाण्यात त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.यावेळी भिवंडीतील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बल्लाळ यांनी त्यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास न देता कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या व शक्य तितक्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या.यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांपासून पोलीस कर्मचारी भावुक झाले होते.

त्यांनतर बल्लाळ यांना निरोप देतांना पोलीस ठाण्यात त्यांना फेटा घालून फुलांचा वर्षाव करून निरोप दिला.यावेळी नारपोली पोलीस ठाणे फुलांनी व रांगोळ्यांनी सजवले होते.वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्हेगारांना अटक करून जनसामान्यांना न्याय दिला असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी दिल्या.या निरोप समारंभाप्रसंगी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी गहिवरले होते तर अनेकांच्या आसवांचा बांध मोकळा झाला होता.

शिक्षक अथवा इतर अधिकाऱ्यांच्या बदली अथवा सेवा निवृत्ती प्रसंगी जसा भावनिक प्रसंग असतो तसाच भावनिक प्रसंग यावेळी नारपोली पोलीस ठाण्यात पाहायला मिळाला.कर्मचाऱ्यांनी दिलेल्या या निरोपाने स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ देखील भावुक झाले होते.यावेळी बल्लाळ यांनी संपूर्ण पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानून पोळीस ठाण्याचा निरोप घेतला.

टॅग्स :bhiwandiभिवंडीPoliceपोलिस