शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

भिवंडी एसटी आगार गेले खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 02:39 IST

प्रवाशांना होतोय त्रास : दोन वर्षे आगारप्रमुखाची नेमणूक नाही, विविध समस्यांनी घेरले

- पंढरीनाथ कुंभारभिवंडी : दररोज तीस हजारांपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या भिवंडी एसटी आगारास दोन वर्षांपासून आगारप्रमुखाची नेमणूकच झालेली नसल्याने प्रवासी व कर्मचाºयांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर दोन वर्षांपासून झालेले खड्डे वेळीच न बुजवल्याने महिनाभर झालेल्या पावसाने आगारात पाणी साचून तळे झाले आहे.एसटी आगारातून ठाणे व कल्याण मार्गावर अधिक बस धावत असून रोज येथून ३० हजार प्रवासी प्रवास करतात. तर बाहेरगावाहून येणाºया बसमधून २० हजार प्रवासी प्रवास करतात. या आगारातून महामंडळास चांगला फायदा होत असताना राज्य परिवहन मंडळाचे या आगाराकडे दुर्लक्ष होत आहे. तीन वर्षापूर्वी पावसाळ्यात झालेल्या खड्ड्यामुळे आगाराचे पूर्णपणे डांबरीकरण केले. हे डांबरीकरण करताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधकाम विभागाने कोणतीही उपाययोजना केली नाही. यामुळे गेल्यावर्षीही आगारात खड्डे पडून पाणी साचले होते.यावर्षी आगारात झालेल्या खड्ड्यांनी आगाराची दुरवस्था झाली आहे. पावसाचे पाणी साचल्याने आगारातील स्थानकाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशव्दाराजवळ मोठे तळे झाले आहे. तर आगारात खड्डे झाल्याने प्रवाशांना बसमध्ये चढणे व उतरण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. बस पकडण्याच्या धावपळीत काही विद्यार्थी व जेष्ठ नागरिक खड्ड्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत. असे अपघात होऊ नये म्हणून भिवंडी आगाराच्या व्यवस्थापनाने मार्च-एप्रिलमध्ये लेखी पत्र ठाणे विभागीय कार्यालयाला दिले आहे. परंतु बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने प्रवासी, बस चालकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागत आहे.कमी कालावधीसाठी अधिकारीमागील दोन वर्षापासून आगार व्यवस्थापकाची नेमणूक न झाल्याने आगाराचे व्यवस्थापन प्रभारी अधिकारी सांभाळत आहेत. त्यामुळे आगारातील महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी अडथळे येत आहेत. दरम्यानच्या काळात राठोड नावाच्या अधिकाºयाची वर्णी लागली होती. परंतु त्यांची नेमणूक अत्यल्प काळाचीच ठरली.पत्राकडे पालिकेचे दुर्लक्ष : आगाराबाहेरील रस्ते व गटाराची उंची वाढत असल्याने आगारातील जमीन खाली गेली आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. मात्र आगाराच्या मागील बाजूस अथवा आगारातील कर्मचारी निवासस्थानाच्या जागेतून पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकतो. यासाठी आगार व्यवस्थापनाने महापालिकेकडे पत्र दिले आहे. परंतु त्याकडे पालिकेच्या शहर अभियंत्यासह इतर अधिकाºयांनी दुर्लक्ष केले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीstate transportराज्य परीवहन महामंडळPotholeखड्डे