शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Bhiwandi: भिवंडीत सहा वर्षाच्या चिमुरड्याची हत्या; आरोपीस अटक

By नितीन पंडित | Updated: July 26, 2024 21:09 IST

Bhiwandi Crime News: घरात पाहुणा म्हणून राहणाऱ्या इसमाने त्याच घरातील तरुणीशी छेडछाड व मारहाण करताना सहा वर्षाच्या चिमूरड्याने पाहिले असता सदर प्रकरण मुलगा आईला सांगेल या भीतीने सहा वर्षाच्या चिमूरड्याची गळा आवळून हत्या केल्याची घटना हायवे दिवे गावात घडली आहे.

- नितीन पंडितभिवंडी - घरात पाहुणा म्हणून राहणाऱ्या इसमाने त्याच घरातील तरुणीशी छेडछाड व मारहाण करताना सहा वर्षाच्या चिमूरड्याने पाहिले असता सदर प्रकरण मुलगा आईला सांगेल या भीतीने सहा वर्षाच्या चिमूरड्याची गळा आवळून हत्या केल्याची घटना हायवे दिवे गावात घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात हत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर नारपोली पोलिसांनी अवघ्या २४ तासात संभाजीनगर येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

अमोल चव्हाण वय २२ असे अटक आरोपीचे नाव आहे.तर सुधीर विष्णू पवार वय ६ वर्ष असे हत्या झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. हायवे दिवे येथील ओमसाई राम बिल्डींग येथील सह वर्षाचा सुधीर यास २१ जुलै रोजी बुशुद्ध अवस्थेत कळवा येथील शासकीय रुग्णालयात त्याचे नातेवाईक उपचारासाठी घेऊन गेले होते.वैद्यकीय तज्ञांनी सुधीर मयत असल्याचे सांगितल्याने त्याबाबत कळवा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती.परंतु शवविच्छेदनात सुधिरचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यानंतर नारपोली पोलिस ठाण्यात अज्ञाता विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कामत,पोलिस निरीक्षक (गुन्हे ) प्रमोद कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे व त्यांच्या पथकातील हुडेकरी,जाधव, देसले, ताटे या पोलिस कर्मचाऱ्यांनी हत्ये बाबत कोणताही पुरावा नसताना शिताफीने तपास करताना हत्या झाल्यापासून तेथील अमोल चव्हाण यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्या शोधा साठी पोलिस पथक संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे दाखल झाले.त्या ठिकाणी लपून बसलेल्या आरोपीस ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याने हत्या केल्याची कबुली दिली.

 जुलै रोजी आरोपी अमोल चव्हाण याने मयत सुधीर याची मोठी बहीण चंपा हिचेसोबत छेडछाड व मारहाण केली होती .ते सुधीर याने पाहिल्याने ही घटना आईवडिलांना सांगणार असे सांगितल्याने आरोपी अमोल चव्हाण याने सुधिर यांस त्याच इमारतीच्या छतावर नेऊन गळा आवळून ठार मारले व त्यानंतर तो बेशुद्ध असल्याचा बनवा करून त्यास उपचारासाठी कळवा ठाणे येथील रुग्णालयात घेऊन गेल्याचे कबूल केल्याने पोलिसांनी अमोल चव्हाण यास हत्ये प्रकरणी दाखल गुन्ह्यात अवघ्या २४ तासात अटक केली आहे.आरोपीस न्यायालयात हजर केले असता १ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी