शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
2
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
3
कपिल शर्माला टक्कर द्यायला येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
4
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
5
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
6
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
7
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
8
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
9
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
10
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
11
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
12
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
13
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
14
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
15
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
16
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
17
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
18
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
19
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
20
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद

भिवंडी महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवडणूक स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 1:33 AM

भिवंडी : शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची शुक्रवारी नियोजित असलेली निवडणूक कोकण आयुक्तांच्या आदेशांनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी ...

भिवंडी : शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची शुक्रवारी नियोजित असलेली निवडणूक कोकण आयुक्तांच्या आदेशांनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा रद्द केली. त्यासाठी नव्याने प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मात्र, विविध विषय समित्यांचे सभापती आणि उपसभापती यांची निवडणूक सुरळीत पार पडली.

स्व. विलासराव देशमुख सभागृहात हात उंचावून झालेल्या या निडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. नार्वेकर यांनी काम पाहिले. यावेळी आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, ठाणे महाजिल्हा पालिका प्रशासन अधिकारी प्रकाश बोरसे उपस्थित होते.बांधकाम समिती सभापती नाजेमा मो. हदीस अन्सारी आणि उपसभापती म्हणून जुबेर अहमद मो. फारूक, आरोग्य आणि स्वच्छता समिती सभापती मुख्तार अहमद मोहमद आली खान तर उपसभापती म्हणून साजिद हुसेन तफज्जूल हुसेन अन्सारी, शिक्षण समिती सभापतीपदी वैशाली मनोज म्हात्रे, तर उपसभापती म्हणून फरजाना मो. इस्माईल रंगरेज, क्रीडा समिती सभापतीपदी परवेज अह. सिराज अह. मोमीन तर उपसभापती म्हणून नाजेमा मो. हदीस अन्सारी, गलिच्छ वस्ती सुधार समितीच्या सभापतीपदी मनीषा दांडेकर तर उपसभापती फिरोजा अबुसुफियान शेख, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी नादिया इर्शाद खान तर उपसभापतीपदी सुग्राबी हाजीशाहा खान यांची निवड झाल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. यावेळी सर्व सभापती-उपसभापतींचे पुष्पगुच्छ देऊ न अभिनंदन करण्यात आले.

तक्रार निवेदनामुळे स्थगिती

दरम्यान, स्थायी समिती सभापती निवडणुकीवर माजी खासदार सुरेश टावरे आणि माजी आमदार रशीद ताहीर मोमीन यांनी कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्याकडे तक्रारी निवेदन सादर केले होते. त्याची दखल घेऊन त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर यांना भिवंडी महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी नव्याने प्रक्रि या सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक स्थगित करून उर्वरित विषय समितींच्या निवडणुका शुक्र वारी पार पडल्या.

टॅग्स :BhiwandiभिवंडीMayorमहापौरthaneठाणे