शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बुलेट ट्रेनच्या ६१ हेक्टर शेत जमिनीच्या मोजणीस भिवंडीतील शेतकरी तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 20:37 IST

१३१ खातेदार शेतकऱ्यांना पूर्ण विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही केली जाईल असे डॉ. नळदकर यांनी सांगितले. बुलेटट्रेनसाठी लागणाऱ्यां  शेत जमिनीसाठी विशेषत: अंजूर , भरोडी , हायवेदिवे येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. त्यावर तोडगा निघावा यासाठी भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर व शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. भारव्दाज चौधरी, हिरा पाटील यांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा सुरु होती.

ठळक मुद्देभिवंडी तालुक्यातील ६१ हेक्टर जमिनीची मोजणी होण्याचा मार्ग१२९ खातेधारक शेतकऱ्यांच्या ६०.६४ हेक्टर जमिनीची मोजणी करण्याचे नियोजन निश्चित भिवंडीमधील शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनच्या संयुक्त जमीन मोजणीस आता हिरवा कंदील

ठाणे : बुलेट ट्रेनसाठी भिवंडी तालुक्यातील ६१ हेक्टर शेत जमीन लागणार आहे. या जमिनीच्या संयुक्त मोजणीस शेतकऱ्यांनी एकमुखी संमत्ती दिली असल्याचा दावा करण्यात येत आहे. यासाठी प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांच्या दालनात शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक  पार पडली. त्यात शेतकऱ्यांनी जमीन मोजणीस होकार दिल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे.या बुलेट ट्रेनच्या भूसंदपादनासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी व जिल्हा प्रशासनाची सातत्याने चर्चा सुरु आहे. भिवंडीमधील शेतकऱ्यांनी बुलेट ट्रेनच्या संयुक्त जमीन मोजणीस आता हिरवा कंदील दाखविल्यामुळे आता पुढील आंमलबजावणीला वेग येणार आहे. भिवंडी तालुक्यातील ६१ हेक्टर जमिनीची मोजणी होण्याचा मार्ग सुकर झाला आहे. एकंदरीत १३१ खातेदार शेतकऱ्यांना पूर्ण विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही केली जाईल असे डॉ. नळदकर यांनी सांगितले.बुलेटट्रेनसाठी लागणाऱ्यां  शेत जमिनीसाठी विशेषत: अंजूर , भरोडी , हायवेदिवे येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. त्यावर तोडगा निघावा यासाठी भिवंडी उपविभागीय अधिकारी डॉ.मोहन नळदकर व शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. भारव्दाज चौधरी, हिरा पाटील यांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा सुरु होती. शेतकऱ्यांनी काही अटी कायम ठेवून संयुक्त जमीन मोजणीस होकार दिला आहे. यामुळे १७ ते १९ जानेवारी दरम्यान अंजूर, भरोडी, हायवेदिवे येथील १२९ खातेधारक शेतकऱ्यांच्या ६०.६४ हेक्टर जमिनीची मोजणी करण्याचे नियोजन निश्चित केले आहे. या बैठकील हायस्पीड ट्रेनचे नायक, उप अधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद ठुबे आदींची देखील उपस्थिती होती.* शेतकऱ्यांच्या या अटी मान्य -या शेतजमीन बाधित शेतकऱ्यांना मोबदला ठरविण्यासाठी नेमलेल्या शासकीय समितीमध्ये प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नेमावा, बुलेट ट्रेन मार्गिकेला समांतर असलेला सर्व्हिसरोड भरोडी येथे संपतो, त्यामुळे प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गिकेला समांतर असलेल्या सर्व्हिसरोडला भरोडी ते म्हातारडी, डोंबिवली यांना जोडणारा सर्व्हिसपूल द्यावा . तसेच प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी सुरई,भरोडी व अंजूर या भागात कारशेड प्रस्तावित आहे. या कारशेडमध्ये स्थानिक भूमीपुत्राना केवळ मजूर म्हणून नोकरी न देता त्यांना कौशल्यकामाची नोकरी द्यावी.त्यासाठी मुलांना स्वखर्चाने प्रशिक्षीत करून त्यांना प्राधान्याने सामावून घ्यावे अशा काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :thaneठाणेDistrict Collector Aurangabadजिल्हाधिकारी औरंगाबाद