प्रोटोकॉलच्याच्या नावाखाली ठाणे जिल्ह्यातील भाजपा - शिवसेनेचा कुलगी तुरा !

By सुरेश लोखंडे | Published: January 10, 2019 07:57 PM2019-01-10T19:57:07+5:302019-01-10T20:02:23+5:30

सिध्दगडवरील कार्यक्रमाच्या निमित्ताने मुरबाड तालुक्यातील सुमारे ४० कोटी खर्चाच्या रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. स्थानिक खासदार कपील पाटील व आमदार म्हणून कथोरे यांना निमित्त मिळणे अपेक्षित होते. पण ते मिळाले नाही. पालकमंत्र्यांच्या कार्यक्रामात प्रोटोकॉल न पाळल्यामुळे कार्यकर्त्यांच्या संतापास अनुसरून कथोरे यांनी त्या दिवशी सकाळीच उद्घाटन उरकून घेत पालकमंत्र्यांच्या सिध्दगडावरील सलामीच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली. उद्घाटन स्थळी गेल्यावर निदर्शनात आल्याचे पालकमंत्र्यांनी हसत हसत या विषयावरील चर्चात स्पष्ट केले

In the name of protocol BJP of Thane district - Shiv Sena's Koli Tura! | प्रोटोकॉलच्याच्या नावाखाली ठाणे जिल्ह्यातील भाजपा - शिवसेनेचा कुलगी तुरा !

वर्षातील प्रोटोकॉल पाळलच्या नावाखाली जिल्ह्यात भाजपा - शिवसेनेचा कलगी तुरा शनिवारच्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत

Next
ठळक मुद्दे माझा खासदार म्हणून हक्क भंग झाल्याची जाणीव करून देण्यात आलीपालकमंत्र्यांच्या कार्यक्रामात प्रोटोकॉल न पाळल्यामुळे जिल्हा परिषदेत काय राजकारण सुरू आहे, चार चार महिने त्यांच्या फाईलवर स्वाक्षरी का होत नाही

सुरेश लोखंडे
ठाणे : मुरबाड तालुक्यात ४० कोटी रूपये खर्चाच्या रस्त्यांचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार पण त्या आधीच सकाळी अंधारात भाजपाचेआमदार किसन कथोरे यांनी उरकून घेतल्याचे त्यांनी उद्घाटन स्थळी गेल्यावर कळले. प्रोटोकॉल पाळला जात नसल्याच्या संतापातून उद्घाटन उरकून घेतल्याचे वास्तव उघड झाले. पालकमंत्र्यांनी हसत हसत हा विषय हाताळला. पण चार वर्षातील प्रोटोकॉल पाळलच्या नावाखाली जिल्ह्यात भाजपा - शिवसेनेचा कलगी तुरा शनिवारच्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत दिसून आला.
सिध्दगडवरील कार्यक्रमाच्या निमित्ताने मुरबाड तालुक्यातील सुमारे ४० कोटी खर्चाच्या रस्त्यांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार होते. स्थानिक खासदार कपील पाटील व आमदार म्हणून कथोरे यांना निमित्त मिळणे अपेक्षित होते. पण ते मिळाले नाही. पालकमंत्र्यांच्या कार्यक्रामात प्रोटोकॉल न पाळल्यामुळे कार्यकर्त्यांच्या संतापास अनुसरून कथोरे यांनी त्या दिवशी सकाळीच उद्घाटन उरकून घेत पालकमंत्र्यांच्या सिध्दगडावरील सलामीच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली. उद्घाटन स्थळी गेल्यावर निदर्शनात आल्याचे पालकमंत्र्यांनी हसत हसत या विषयावरील चर्चात स्पष्ट केले. पण हा विषय गांभीर्याने घेत कथोरे यांच्यासह खासदार कपील पाटील यांनी प्रोटोकॉल पाळला जात नसल्याची जाणीव पालकमंत्र्या करून देत तीव्र नाराजी व्यक्त केली.
केंद्र व राज्य शासनाच्या आधीवेशन काळात कोणतेही उद्घाटन कार्यक्रम करता येत नसल्याचे पाटील यांनी शासन परिपत्रकच सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले. तरी देखील माझ्या मतदार संघात उद्घाटन घेण्यात आले. या कार्यक्रमामुळे माझा खासदार म्हणून हक्क भंग झाल्याची जाणीव करून देण्यात आली. तर मतदार संघात पालकमंत्री येणार असल्याचे कळल्यावर मला आनंदच झाला असता. पण तसे होत नसल्याचे कथोरे यांनी सांगितले. मला कळवले असते तर उद्घाटन स्थळी मी गर्दीही गोळा केली असते. या चार पाच कोटींच्या कामांचे नव्हे तर ४०० ते ५०० कोटींच्या कामांचे उद्घाटन मी पालकमंत्र्यांच्या हस्ते केले असते. तसे तीन - चार रस्ते माझ्याकडे आजही आहे. आपण सत्तेत असून तेथे (मुरबाडला) आपली युती असल्याचे कथोरे यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनात आणून दिले.
जिल्हा परिषदेतील शिवसेना - राष्ट्रावादीच्या सत्तेस अनुसरून बोलताना कथोरे म्हणाले जिल्हा परीषदेत तुमची आघाडी आहे. पण मुरबाडला आपली युती आहे, अशी पालकमंत्र्याना आठवण करून दिली. राष्ट्रावादीचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांचे नाव न घेता ते म्हणाले जिल्हा परिषदेमधील तुमच्या मित्राने उद्घाटनाच्या आदल्या दिवशी तुम्ही नाही आले तरी चालेल, उद्घाटन करून घेऊ, आमची ठेकेदारी चालली पाहिजे असे सांगितले, पण साहेब मुरबाडचे ते डांबर आता मी ठेवले नाही, कधी बदलले आहे आणि तसे झाले तर आपल्या तोंडाला काळीमा लागेल, असेही कथोरे यांनी संतापाने सभागृहात सांगितले.
तसे माझ्या डोक्यात नाही, काम करायचे आणि लोकाना त्याचा कसा फायदा होईल हे बघायचे , पत्रिकेवर सर्व खासदार आमदाराचे नावे होते. मला वाटले सिध्दगडच्या कार्यक्रमास सर्वच येणार म्हणून मी कोणाशीच संपर्क साधला नाही. मी खाली आल्यानंतर तुम्हाला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण तो लागला नाही. असे पालकमंत्र्यानी स्पष्ट करून या पुढे सर्वच खासदार, आमदारांचा प्रोटोकॉल पाळण्याचे निर्देश त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना दिले. या आधीही पाटील यांच्या कथोरे यांनी जिल्हा परिषदेमध्ये फाईलवर स्वाक्षरी होत असल्यीची गंभीर चर्चा केली. जिल्हा परिषदेला आपण डीपीसी पैसा देते, जिल्हा परिषद हे एजेंशी आहे. विकासाचे काम त्यांच्याकडून होणे अपेक्षित आहे. पण चार चार महिने त्यांच्या फाईलवर स्वाक्षरी का होत नाही. जिल्हा परिषदेत काय राजकारण सुरू आहे, असेही पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या लक्षात आणून देत भाजपाची आडवणुकीची जाणीव करून दिली.

Web Title: In the name of protocol BJP of Thane district - Shiv Sena's Koli Tura!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.