शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील शेतकऱ्याने खरेदी केले हेलिकॉप्टर, दुधाच्या व्यवसायासाठी घेतले ‘वाहन’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2021 05:57 IST

farmer buy helicopter : भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे व मूळचे शेतकरी असलेले भोईर यांनी चक्क ३० कोटींचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना अचंबित केले आहे.

लोनाड : हौसेला मोल नाही हा शब्दप्रयोग बऱ्याच वेळा चेष्टेखातर वापरला जातो. परंतु भिवंडी तालुक्यातील वडपे गावातील शेतकरी असलेल्या उद्योजक जनार्दन भोईर यांनी चक्क हेलिकॉप्टर खरेदी केले आहे.भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात विस्तारल्याने या भागात आर्थिक सुबत्ता आली आहे. ग्रामीण भागात महागड्या कार फिरताना नेहमीच दिसतात. एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात वापरली जाणारी कार भारतात प्रथम खरेदी करण्याचा बहुमान भिवंडी तालुक्यातील दिवेअंजूर येथील अरुण आर. पाटील या आगरी समाजातील उद्योजकाकडे जातो. आता भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे व मूळचे शेतकरी असलेले भोईर यांनी चक्क ३० कोटींचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना अचंबित केले आहे.भोईर यांनी बांधकाम व्यवसायाला  सुरूवात करून आपल्या जमिनीवर गोदाम बनविले तर काही विकासकांना जमीन विकसित करायला दिली. त्यांचा व्यवसायानिमित्ताने उद्योजक, व्यावसायिक, चित्रपटसृष्टीतील व्यक्तींशी संपर्क आल्याने त्यांनी या नव्या व्यवसायाचे धाडस केले. स्वतःच्या दुग्ध व्यवसायासाठी पंजाब, हरियाणा, गुजरात, राजस्थान येथे नेहमी जावे लागते, तर व्यावसायिक संबंधातील व्यक्तींना या भागात येण्यासाठी हेलिकॉप्टर घेण्याचा निर्णय घेतल्याचे भोईर यांनी सांगितले.

विजयी सदस्यांना फेरफटकाहे हेलिकॉप्टर १५ मार्च रोजी येणार आहे. त्यांच्या जागेवरील व्यवस्थेची चाचपणी करण्यासाठी मुंबई येथून काही तंत्रज्ञ रविवारी हेलिकॉप्टर घेऊन वडपे गावात आले. तिथे अडीच एकर जागेवर संरक्षक भिंतीसह हेलिपॅड, हेलिकॉप्टर ठेवण्यासाठी गॅरेज, पायलट, इंजिनिअर, सुरक्षारक्षक यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. हेलिकॉप्टरमध्ये भोईर यांनी स्वतः न बसता ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी सदस्यांना फेरफटका मारून आणला.

टॅग्स :bhiwandiभिवंडीmilkदूध