शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीमध्ये भोंगळ कारभार सुरूच

By admin | Updated: May 8, 2017 06:00 IST

अर्ज भरण्याची मुदत उलटून चोवीस तास गेल्यावरही भिवंडी पालिका निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी तयार नसल्याचा

लोकमत न्युज नेटवर्कभिवंडी : अर्ज भरण्याची मुदत उलटून चोवीस तास गेल्यावरही भिवंडी पालिका निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी तयार नसल्याचा अनुभव रविवारी आला. निवडणूक निर्णय कार्यालयाने उमेदवारांची यादी न दिल्याचा आरोप पालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केला. आॅनलाइन अर्ज स्वीकारूनही वेगवेगळ््या कार्यालयांकडून ही न मिळाल्याने निवडणूक विभागाची यंत्रणा सपशेल कोलमडल्याचे दिसून आले. नेहमीप्रमाणे यावेळीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न केला. उमेदवारांच्या यादीबाबत माहिती विचारली असता एका निवडणूक अधिकाऱ्यांने काल रात्री त्यांना फौजदारी केस करण्याची धमकी दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. पालिकेचे कर्मचारी या यादीवर मध्यरात्री दोन वाजेपर्यंत काम करीत असतानाही त्यांना माहिती पुरवली जात नव्हती. रविवारी दुपारी चारपर्यंत पालिकेच्या जनसंपर्क कार्यालयाने आठ कार्यालयांपैकी तीन कार्यालयांतील उमेदवारांची यादी पत्रकारांना पुरवली. याबाबत निवडणूक अधिकारी तथा आयुक्त योगेश म्हसे यांनी केलेली व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे अनुभवास आले. या गोंधळामुले नेमके किती जणांनी अर्ज भरले, याबाबतचा घोळ कायम होता. अखेर ६२९ जणांनी अर्ज भरल्याचे सांगण्यात आले. एक खिडकी योजनेतील अधिकाऱ्यांची अरेरावी आणि कागदपत्रे सादर करण्यातील घोळामुळे अनेकांना अर्ज भरता न आल्याचा आरोपही उमेदवारांनी केला. या अधिकाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण नव्हते. नंतर या खिडकीजवळ पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पण तेथील कर्मचाऱ्यांच्या बेताल वागण्याने कार्यकर्त्यांचे अनेकवेळा वाद झाले.निवडणूक कार्यालयांत दाखल झालेल्या अर्जाबाबतच्या माहितीनुसार काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, शिवसेना, भाजपा, कोणार्क विकास आघाडी, भिवंडी डेव्हलपमेंट फ्रन्ट, एमआयएम, आरपीआय (आठवले), आरपीआय (सेक्युलर), आरपीआय (एकतावादी), संभाजी ब्रिगेड यांच्या उमेदवारांसह मोठ्या संख्येने अपक्षांनी अर्ज भरले आहेत. पक्षाकडून निधी न मिळाल्याने बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी या वेळी निवडणुकीत उडी घेतली नाही, गायत्रीनगरच्या पॅनेलमध्ये चारही उमेदवार कोणार्क विकास आघाडीच्या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याने भाजपाने उमेदवार दिले नव्हते. मात्र त्यातील आरपीआय एकतावादीच्या उमेदवारांनी चिन्हाचा वाद झाल्याने आपल्याच पक्षाच्या निवडणूक लढवण्याचे जाहीर केल्याने कोणार्कला धक्का बसला. कोणार्क आघाडीशी समझोता झाल्याने भाजपाने त्याच्यासमोर उमेदवार दिले नसले, तरी शिवसेनेसह इतर पक्षांनी मात्र उमेदवार उभे केले आहेत.जवळजवळ सर्वच पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील एक पक्षाच्या चिन्हावर आणि दुसरा अपक्ष म्हणून भरला आहे. आमदार महेश चौघुले यांच्या पत्नी मेघना यांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. माजी नगरसेवक प्रकाश टावरे यांनी वंदना व आरती या दोन्ही पत्नींचे वेगवेगळे अर्ज भरले आहेत. हत्या झालेले काँग्रेसचे नेते मनोज म्हात्रे यांची पत्नी वैशाली आणि मुलगी हर्षाली यांनी अर्ज भरले आहेत. तडजोडीचे प्रयत्न : सर्व प्रमुख पक्षांत बंडखोरी झाली आहे. त्यांनी गुूवारपर्यंत अर्ज मागे घ्यावे म्हणून त्यांची समजूत काढण्याचे, तडजोडीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय मूळ पक्षाचा अर्ज वैध ठरला नाही, तर खबरदारी म्हणून अपक्ष म्हणूनही अर्ज भरण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारची छाननी आणि पुढील तीन दिवस उमेदवारांसाठी महत्वाचे आहेत.