शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी शहरातील घरपट्टी आणि पाणीपट्टी तीन महिने माफ ; ऑनलाइन महासभेत महापौरांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 23:28 IST

लॉक डाऊन काळातील तीन महिन्याचे मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा ऑनलाइन महासभेत महापौर प्रतिभा पाटील यांनी केली.

भिवंडी  - करोना संसर्ग टाळण्यासाठी बुधवारी भिवंडी महानगरपालिका सभागृहात महासभा सभेच्या विषय पत्रिके वरील नियोजित लॉक डाऊन काळातील तीन महिन्याचे मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याची घोषणा ऑनलाइन महासभेत महापौर प्रतिभा पाटील यांनी केली.  यावेळी प्रत्यक्ष सभागृहात महापौर प्रतिभा पाटील , उपमहापौर इम्रान खान, आयुक्त पंकज आशिया, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी, विरोधी पक्ष नेता यशवंत टावरे, सभागृह नेता विलास पाटील , सचिव अनिल प्रधान यांसह नागरसेवक संतोष शेट्टी, अरुण राऊत, संजय म्हात्रे, डॉ.जुबेर, प्रकाश टावरे,मुख्तार खान, इत्यादी सदस्य सभागृहात उपस्थित होते. सभेच्या विषय पत्रिकेतील कोरोना व लॉक डाऊन काळातील तीन महिन्याचे मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याचा विषय पत्रिकेतील चर्चा सुरू झाली.त्या मध्ये स्थायी सभापती हलीम अन्सारी यांनी चर्चेला सुरुवात केली.त्यास सभागृह नेता विलास पाटील यांनी अनुमोदन दिले.ऑनलाईन झूम अँप द्वारे नगरसेवक सिद्धेश्वर कामुर्ति, जावेद दळवी, मनोज काटेकर, मदन बुवा नाईक, रिषिका राका,सिराज ताहीर, प्रशांत लाड चर्चेत सहभागी झाले होते. महापौर यांनी सांगितले की, कोरोना लॉक डाऊन काळात शहरातील व्यापारी, करदाते, गरीब नागरिक यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून येणारे नाही.शहरातील नागरिक यांना थोडासा तरी आर्थिक दिलासा देणे हे महानगरपालिकेच्या मुख्य काम आहे. ही बाब लक्षात घेता शहरातील नागरिकांना तीन महिने मालमत्ता कर व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तरी प्रशासनाने त्या प्रमाणे कारवाई करावी याबाबत महापौर यांनी आदेश प्रशासनास दिले. तसेच संपूर्ण शहरातील नागरिक सेवा भावी संस्था, गरीब गरजू यांना मदत करणाऱ्या संस्था, मोहल्ला क्लिनिक सुरू करून वैद्यकीय व्यावसायिक, अन्य नागरिक, महापालिका सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळे कोरोनाचे रुग्ण संख्या कमी होत आहे. त्यामुळे या शहरवासिय यांनी चांगले काम केले आहे. सर्व शहर वासीय यांचे महापौरांनी आभार मानले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbhiwandiभिवंडी