शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत भीषण अग्नितांडव; दापोडा भागातील गोदामे भस्मसात; इलेक्ट्रॉनिक वस्तू, वॉटर प्युरिफायर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 04:50 IST

भिवंडीतील गोदामांना शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याने बड्या नामांकित कंपन्यांची किमान १२ मोठी गोदामे जळून भस्मसात झाली. या घटनेत जीवितहानी झाली किंवा कसे, ते अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी कोट्यवधी रुपयांच्या इलेक्ट्रीक वस्तू, वॉटर प्युरिफायर यांची हानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठाणे/भिवंडी : भिवंडीतील गोदामांना शनिवारी दुपारी भीषण आग लागल्याने बड्या नामांकित कंपन्यांची किमान १२ मोठी गोदामे जळून भस्मसात झाली. या घटनेत जीवितहानी झाली किंवा कसे, ते अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी कोट्यवधी रुपयांच्या इलेक्ट्रीक वस्तू, वॉटर प्युरिफायर यांची हानी झाली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग विझवण्याकरिता मुंबईहून अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात आले. ही आग पूर्णपणे विझवण्याकरिता आणखी काही तास लागतील, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाºयांनी दिली.भिवंडी, दापोडा भागातील १६१ कॉर्पोरेशन, इंडियन गेट कंपनी माणकोली, व्हीआरएल लॉजिस्टीक यांच्या गोदामाला दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. आजूबाजूची किमान १२ गोदामे आगीच्या भक्षस्थानी पडली. आग विझवण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या गाड्या, कल्याण महापालिकेच्या गाड्या अपुºया पडल्याने मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून कुमक मागवावी लागली. रात्री ८ वाजता आग नियंत्रणात आली असली, तरी खबरदारीची उपाययोजना म्हणून अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी तैनात ठेवण्यात आल्या आहेत. आग पूर्णपणे विझवण्यासाठी आणखी किमान १० ते १२ तासांचा अवधी लागण्याची शक्यता अग्निशमन विभागाने व्यक्त केली.काही दिवसांपूर्वी भिवंडीत गोदामाला आग लागली होती. शनिवारी दुपारी पुन्हा माणकोली भागातील व्हीआरएल लॉजिस्टीक या गोदामाला आग लागली. तिने आजूबाजूच्या गोदामांना ज्वाळांमध्ये लपेटले. सुरुवातीला अ‍ॅपेक्स या मिनरल वॉटर प्युरिफायर कंपनीच्या गोदामास आग लागली. त्या ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या बनवण्यासाठी कच्चा माल म्हणून साठवलेल्या प्लास्टिकच्या दाण्यांच्या साठ्यांनी लागलीच पेट घेतला. भडकलेली आग नजीकच्या व्होल्टास कंपनीच्या गोदामात पसरली. तेथे साठवलेले फ्रीज, एसी, पंखे तसेच इतर इलेक्ट्रीक वस्तूंची सात गोदामे जळून खाक झाली. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, सुमारे ५० ते १०० मीटर धुराचे लोट आकाशात पसरले होते. आगीत व्होल्टास कंपनीची सात गोदामे, अ‍ॅपेक्स मिनरल वॉटर कंपनीची तीन गोदामे व इतर केमिकल कंपन्यांची दोन गोदामे यांची मोठी हानी झाली.आगीच्या घटनेमुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी झाली. काही हौशी वाहनचालकांनी आगीच्या धुरांचे लोट मोबाइलमध्ये चित्रित करण्याकरिता आपली वाहने रस्त्यात थांबवून चित्रीकरण सुरू केले होते.उच्चस्तरीय चौकशीची मागणीअग्नितांडव सुरू होताच या परिसरातील कामगारांनी मिळेल त्या वाटेने पळ काढला. त्यामुळे जीवितहानी झाली नसावी, असा अंदाज आहे. मात्र, त्याची नेमकी माहिती अजून उपलब्ध झालेली नाही.आजूबाजूच्या गोदामांमधील कामगारांनी व बघ्यांनी केलेली गर्दी हटवताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्याकरिता चौकशी करण्यात येणार असल्याचे अग्निशमन अधिकारी व पोलिसांनी सांगितले.फेब्रुवारी-मार्चदरम्यान भिवंडीतील गोदाम भागात आगीचे प्रमाण वाढत असल्याने याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली. आग विझवण्यासाठी या परिसरातील पाणीटंचाईमुळे पाण्याचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगितले.कल्याणमध्ये बसला आगकल्याण : खाजगी बसचे इंजीन गरम झाल्याने त्याने पेट घेतल्याची घटना शनिवारी दुपारी सहजानंद चौकात घडली. या बसमधील प्रवासी वेळीच खाली उतरल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचालकाने प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवले.

टॅग्स :fireआग