शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर पालिका: सात नगरसेवकांवरील सुनावणी सात महिन्यांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:43 IST

निर्णय होणार की पुन्हा ठरणार फार्स, तक्रारदारांनी केला सवाल

भाईंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेतील सात नगरसेवकांचे पद रद्द करण्याच्या तक्रारींवर तब्बल सात महिन्यांनी महापालिकेला सुनावणी घेण्यास वेळ मिळाला आहे. नगरसेवकांना वाचवण्यासाठी पालिका वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत यात मोठा आर्थिक गैरव्यवहार तर झाला नाही ना, अशी शंका तक्रारदार घेत आहेत. शुक्रवारी आयुक्त बालाजी खतगावकर यांनी पालिकेत सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे यात तरी निर्णय लागेल का, असा सवाल तक्रारदार करत आहेत.मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आॅगस्ट २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सात नगरसेवकांविरोधात बेकायदा बांधकाम, माहिती लपवणे आदी तक्रारी करत नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी तक्रारदारांनी चालवली आहे. भाजपाचे विजय राय, नीला सोन्स, परशुराम म्हात्रे व मेघना रावल या चौघांचा, तर शिवसेनेच्या अनिता पाटील, काँग्रेसचे नरेश पाटील व काँग्रेस समर्थक राजीव मेहरा अशा सात नगरसेवकांचा समावेश आहे.पेणकरपाडा येथील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी भाजपा नगरसेवक म्हात्रे व नगरसेविका पाटील यांचे पद रद्द करण्यासाठी भरत मोकल यांनी ५ जुलै २०१६ रोजी तक्रार केली होती. दोन्ही नगरसेवकांवर उच्च न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर गुन्हा दाखल झाला. परंतु, नगरसेवकपद रद्द करण्यासाठीच्या सुनावणीची मात्र तारीख पे तारीख सुरू आहे. शेवटची सुनावणी ३ आॅगस्ट २०१८ रोजी झाली होती. त्यात परशुराम यांनी लेखी उत्तर दिले, पण पाटील यांनी उत्तर दिले नव्हते.काँग्रेस समर्थक नगरसेवक मेहरा यांनी त्यांच्यावर दाखल गुन्हा लपवला म्हणून भाजपाचे पराभूत उमेदवार साजी आयपी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार साबीर शेख यांनी तक्रारी केल्या आहेत. तर, काँग्रेसचे नरेश पाटील यांनी आपली जन्मतारीख चुकीची व शिक्षण सातवी असताना नववीपर्यंत झाल्याची चुकीची माहिती दिली असल्याने पद रद्द करा, अशी तक्रार भाजपाचे डॉ. सुरेश येवले यांनी केली आहे. यातसुद्धा सात महिन्यांपूर्वी सुनावणी झाली होती व पाटील यांनी आपले म्हणणे सादर केले होते.भाजपा नगरसेविका मेघना रावल यांचे पती दीपक यांनी साईबाबानगर येथे बेकायदा बांधकाम केले म्हणून मेघना यांचे नगरसेवकपद रद्द करा, अशी तक्रार इरबा कोनापुरे यांनी २० नोव्हेंबर २०१७ रोजी केली आहे. पालिकेने दिलेली इमारत बांधकाम परवानगीही चुकीची असून बेकायदा बांधकामही तोडले नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यांची शेवटची सुनावणीही ३ आॅगस्टला घेण्यात आली होती. भाजपा नगरसेविका नीला सोन्स व नगरसेवक विजय राय यांचे मीरा रोडच्या कनकिया भागात कार्यालय, वाचनालयाचे बेकायदा बांधकाम केल्याने त्यांचे पद रद्द करण्याची तक्रार ब्रिजेश शर्मा व रोलन मिरांडा यांनी केली आहे. त्यांचीही सुनावणी सात महिन्यांपूर्वी पालिकेने घेतली होती.महापालिकेकडून सातत्याने सुनावणी पुढे ढकलण्यासह या सत्ताधारी नगरसेवकांवर कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे. यामागे राजकीय दबावासह आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आता येऊ लागला असल्याचा आरोप ब्रिजेश शर्मा यांनी केला आहे. २०१७ पासून तक्रार केली असताना बेकायदा बांधकामावर कारवाई केलेली नाही.बेकायदा बांधकामांवर कारवाईच नाहीजवळपास सात महिन्यांनी आयुक्तांनी सुनावणी ठेवली असून यावेळी तरी निर्णय देणार की, पुन्हा तारीख पे तारीख करत नगरसेवकांना पाठीशी घालणार, असा सवाल इरबा कोनापुरे यांनी केला आहे. तक्रारीतील बेकायदा बांधकामांवरही पालिकेने अजून कारवाई केली नसल्याचे कोनापुरे म्हणाले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक