शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?
2
भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल
3
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपच एक नंबरचा पक्ष, पण कसा? फडणवीसांनी सांगितलं...
4
Monsoon Update : महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! मान्सून काही तासांत मुंबईत धडकणार
5
...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश
6
"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
7
रोहित, विराट यांना मित्रच समज...! शाहीन आफ्रिदीला भारतीय चाहत्यांना प्रेमळ सल्ला, Video 
8
SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..."
9
चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!
10
"राज्यातला निकाल अनपेक्षित, पवारांनाही चार जागा येतील असं वाटत...." आशिष शेलार स्पष्टच बोलले
11
देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना सल्ला; "आता ही वेळ जाहीरपणे..."
12
Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या
13
'भिंतीवरचं पेंटिंग मिटवशील पण सत्य...?', दलजीत कौरने पुन्हा पतीवर साधला निशाणा
14
जोडी नंबर १! भाऊ-बहिणीची कमाल, होणार डेप्युटी कलेक्टर; सांगितला यशाचा 'सुवर्ण मंत्र'
15
"नितीश कुमारांना इंडिया आघाडीने दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर"; JDU चा मोठा दावा
16
Dhananjay Munde : "मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव..."; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन
17
Rahul Gandhi : 'राहुल गांधींना विरोधी पक्षनेते करा', काँग्रेस CWC बैठकीत ठराव मंजूर
18
तुरुंगात होते चंद्राबाबू नायडू, मुलावरही होतं संकट, TDPच्या विजयातील महत्त्वाची व्यक्ती 'ब्राह्मणी' कोण माहितीये?
19
समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर
20
मोदी ३.० मंत्रिमंडळात कुणा-कुणाला मिळू शकते जागा, सामोर आली यादी, या नावांची सुरू आहे चर्चा!

भाईंदर महिला विशेष लोकल २५ डिसेंबरपासून सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 5:18 PM

भाईंदर रेल्वे स्थानकातून आता महिला विशेष लोकल 25 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

ठाणेभाईंदर रेल्वे स्थानकातून आता महिला विशेष लोकल 25 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. मंगळवारी खासदार राजन विचारे यांनी भाईंदर येथून ९:०६ ची बंद केलेली महिला विशेष लोकल सुरु होण्यासाठी पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता, डीआरएम मुकुल जैन, डीआरएम सुहानी मिश्रा, आर पी एफ डी आय जी सौरभ त्रिवेदी, मधुकर रेड्डी, पी एन रॉय इत्यादी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी भाईंदर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, विरोधी पक्षनेते राजू भोईर, माजी उपमहापौर प्रवीण पाटील, उपजिल्हाप्रमुख स्नेहल सावंत- कल्सारिया, नगरसेवक कमलेश भोईर, नगरसेविका नीलम धवन, शहर संघटक सुप्रिया घोसाळकर, तसेच भाईंदर रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला उपस्थित होत्या.

खासदार राजन विचारे यांनी ही लोकल तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून बंद केली असे विचारले. तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांनी आम्ही सर्वे करून ही लोकल बंद केली असे बोलताच, खासदारांनी त्यांना सध्याच्या गर्दीचे छायाचित्र दाखवले व सांगितले की, ही रेल्वे त्वरित चालू करा अन्यथा मला स्वत:ला रेल्वे रुळावर उतरावे लागेल. आम्ही नवीन रेल्वेची मागणी न करता आमची जी बंद केलेली लोकल तीच पुन्हा चालू करा असे सांगितले.

यावर, महाव्यवस्थापक अनिलकुमार गुप्ता यांनी ही रेल्वे आम्ही २५ डिसेंबर पर्यंत नक्की चालू करू, असे आश्वासन दिले आहे. तसेच, खासदार राजन विचारे यांनी मिरारोड व भाईंदर स्थानकावरील सरकते जिने, फलाटांची लांबी, तसेच फलाटांवर छत बसविणे याबाबत विचारले असता, महाव्यवस्थापकानी ही सर्व कामे आम्ही मार्च २०१९ अखेर पर्यंत पूर्ण करू असेही आश्वासन दिले. 

टॅग्स :thaneठाणेlocalलोकल