शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

"भारतीय जनता पक्षानेच मराठ्यांना काळा दिवस दाखवला"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 01:23 IST

हरिभाऊ राठोड यांचा आरोप; १५ ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन

ठाणे : मराठ्यांना आरक्षण देण्याचा अधिकार भाजप सरकारने राज्यांकडून हिरावून घेतला आहे. या निर्णयामुळे ९ सप्टेंबर हा मराठा समाजाने काळा दिवस घोषित केला. या समाजावर ही वेळ भाजपच्या केंद्र सरकारमुळे आणि महाराष्ट्राच्या तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारमुळे आली, असा आरोप भटक्या-विमुक्तांचे, ओबीसी समाजाचे नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, बंजारा आरक्षण, क्रिमीलेअर, बढतीमधील आरक्षण, तांडा सुधार अशा प्रलंबित प्रश्नांवर गोरबंजारा समाजाला न्याय मिळण्यासाठी १५ आॅक्टोबरला राज्यभर तहसीलदार कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डफडे बजाओ आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते म्हणाले की, केंद्र सरकारने २0१८ मध्ये राष्ट्रीय मागास आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भात कायदा मंजूर केला. याअंतर्गत घटनेच्या काही अनुच्छेदांमध्ये सुधारणा करण्यात आली. एसईबीसी घोषित करण्याचे राज्याचे अधिकार काढून संसदेला दिले. त्यामुळे आता कुठल्याही राज्याला एखाद्या समाजास ओबीसीत घ्यायचे झाल्यास संसदेची मंजुरी लागणार आहे. वास्तविक, घटनेच्या अनुच्छेदात सुधारणा करण्यासाठी राज्यसभेत विधेयक चर्चेला आले होते. यावर जनतेकडून सूचना व हरकती मागविल्या होत्या. त्याचवेळी आपण दुरुस्ती सुचविली होती. या दुरुस्तीसंदर्भात विचार झाला असता, तर मराठा समाजावर ही वेळ आली नसती, असे त्यांनी म्हटले आहे.‘मी देणार फॉर्म्युला’भाजप सरकारमुळे मराठा आरक्षणावर संकट ओढवले असले, तरी मुख्यमंत्र्यांसह शरद पवार, अशोक चव्हाण हे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा मुद्दा लवकरच मार्गी लागणार असून, त्यासाठीचा फॉर्म्युला मी सरकारला देणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणBJPभाजपा