शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
4
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
5
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
6
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
7
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
8
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
9
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
10
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
11
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
12
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
13
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
14
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
15
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
16
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
17
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
18
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
19
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
20
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर

Bharat Jodo Yatra: "राहुल गांधींनी भारत जोडण्यापेक्षा त्यांचा खिळखिळा झालेला पक्ष आधी जोडावा", रामदास आठवलेंचा सल्ला  

By धीरज परब | Updated: November 21, 2022 12:37 IST

Ramdas Athawale: राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे . लोकं त्यांना बघायला येतात . भारत जोडण्यापेक्षा त्यांनी आपला खिळखिळा झालेला काँग्रेस पक्ष जोडावा. भारत जोडून ठेवण्यासाठी मोदीजी व आम्ही आहोत.  

-धीरज परब मीरारोड - राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे . लोकं त्यांना बघायला येतात . भारत जोडण्यापेक्षा त्यांनी आपला खिळखिळा झालेला काँग्रेस पक्ष जोडावा. भारत जोडून ठेवण्यासाठी मोदीजी व आम्ही आहोत.  भारत तुटू देणार नाहि त्यामुळे राहुल गांधी यांनी चिंता करू नये असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मीरारोड येथे डॉ . बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन च्या भूमिपूजन प्रसंगी लगावला.

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी मीरारोडच्या हाटकेश भागातील सरकारी जमिनीवर होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन रविवारी रामदास आठवले यांच्या हस्ते पार पडले. जवळपास १ एकर जागेवर हे भवन होणार असून तीन मजली सांस्कृतिक भवन इमारतीमध्ये मंगल कार्यालयसाठी मोठा हॉल , विपश्यना हॉल , प्रदर्शन हॊल , ग्रंथालय , मिनी थिएटर , कॉन्फरन्स रूम , कॅफे एरिया , लिफ्ट अशा सर्व सुविधा असतील. ४ रूम भवनात असतील.  विद्यार्थ्यांना येथे अभ्यास करता येणार आहे.

भूमिपूजन वेळी आमदार गीता जैन , आयुक्त दिलीप ढोले , माजी महापौर निर्मला सावळे व ज्योत्स्ना हसनाळे , शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजू भोईर , माजी नगरसेवक नीला सोन्स, विक्रमप्रताप सिंह , दयानंद शिर्के, कमलेश भोईर , आरपीआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर , रमेश गायकवाड , महेश शिंदे आदींसह नागरिक , पालिका अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

भूमिपूजन नंतर भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजण केले होते . राज्य शासनाने या साठी १५ कोटींचा निधी मंजूर केला असून १ कोटी आ . सरनाईकांचा आमदार निधी तर ११ कोटी महापालिका खर्च करणार आहे . एकूण २७ कोटींचा खर्च यासाठी येणार आहे. या ठिकाणी आंबेडकरांचा पुतळा उभारण्याचे प्रस्तावित आहे . तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांनी आंबडेकर भावनास व त्यासाठी १५ कोटींच्या निधीची मंजुरी देताना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे भवन व्हावे यासाठी तरतूद केली असल्याची माहिती आ . सरनाईक यांनी दिली.

सर्व सुविधांनी सज्ज असे हे भवन येणाऱ्या पिढींना प्रेरणा देईल. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राबरोबरच बँकिंग बाबतचे व स्वयं रोजगाराचेही प्रशिक्षण दिले जावे , असे प्रतिपादन आठवले यांनी केले.

सरकार जाईल असे सुप्रिया सुळे , संजय राऊत म्हणतात. पण हे सरकार जाण्यासाठी नाही तर परत परत येण्यासाठी आहे. शिंदे - फडणवीस यांचे सरकार आणण्या मध्ये सर्वात सरनाईकांचा मोठा वाटा आहे . त्यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते . मी सुद्धा उद्धवजींना पुन्हा पुन्हा सांगत होतो कि तिकडे तुम्हाला जास्त काळ राहता येणार नाही.

मंत्री कसे व्हायचे हे मला माहिती आहे म्हणून मी मंत्री झालो . कधी कोणाला पाठिंबा द्यायचा ते माहिती आहे . मी सत्ता मिळवण्याचे राजकारण करतो , बाबासाहेबांचे राजकारण करतो . एकट्याला शक्य नसेल तर दुसऱ्याशी मैत्री करून सत्तेत आले पाहिजे . त्यामुळे एकही खासदार नसताना मी मंत्री. अनेकांची मंत्री पदे जातात पण तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी मंत्री कायम आहे असे आठवले म्हणाले.

 बाळासाहेबांना २०११ साली त्यांच्या वाढदिवशी मातोश्रीवर भेटायला गेलो होतो . यावेळी त्यांनी शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आली तर महाराष्ट्रात सत्ता आल्या शिवाय राहणार नाही असे सांगितल्याची आठवण आठवलेंनी करून दिली . 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीRamdas Athawaleरामदास आठवलेMira Bhayanderमीरा-भाईंदर