शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

भरत जैन हत्या; एक आरोपी होता सचिन वाझे यांचा चालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 12:36 IST

जैन यांच्या हत्याकांडामध्ये अतुल मिश्रा हा सूत्रधार असला तरी यातील अन्य एक साथीदार नीलेश भोईर हा आरोपी सचिन वाझे यांच्याकडे तसेच निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या एका निकटवर्तीयाकडे चालक म्हणून काही काळ होता.

- जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाण्यातील व्यापारी भरत जैन हत्याकांडातील एक आरोपी नीलेश भोईर हा मनसुख हत्याकांडातील कथित आरोपी निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडे काही काळ चालक म्हणून नोकरीला होता. मनसुख हत्याकांडातून प्रेरणा घेऊन नीलेशने जैन यांची हत्या करून त्यांचा मृतदेह कळवा खाडीत टाकला का, याचा आता तपास केला जात असल्याची माहिती ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

जैन यांच्या हत्याकांडामध्ये अतुल मिश्रा हा सूत्रधार असला तरी यातील अन्य एक साथीदार नीलेश भोईर हा आरोपी सचिन वाझे यांच्याकडे तसेच निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या एका निकटवर्तीयाकडे चालक म्हणून काही काळ होता. मनसुख यांना ज्याप्रमाणे रस्सीने गळा आवळून खून केल्यानंतर त्यांच्या तोंडावर रुमाल बांधून मुंब्रा येथील खाडीत फेकण्यात आले, अगदी तसेच जैन यांचाही गळा आवळून खून केल्यानंतर त्यांचे हातपाय बांधून कळवा खाडीत फेकले होते. मात्र, या सर्वच बाबींची आता पडताळणी सुरू असून भोईर हा वाझे यांचा चालक असण्याशी या प्रकरणाचा संबंध नसल्याचे नौपाडा पोलिसांनी सांगितले. मात्र, पडताळणी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले. परंतु अन्य एका अधिकाऱ्याने या वृत्ताला नाव उघड न करण्याच्या अटीवर दुजोरा दिला आहे. जैन हत्याकांडात सुरुवातीला सुभाष सुर्वे, नंतर कल्याणमधून बळवंत चोळेकर याला अटक केली. तर उत्तर प्रदेशातून अतुल मिश्रासह दोघांना अटक केली.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझे