अंबरनाथ: अंबरनाथमध्ये येऊन भांडुपच्या एका सराईत गुन्हेगाराने धोकादायक पद्धतीने फटाक्यांची आतषबाजी करत सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपो शहजाब याकुब मल्लीक उर्फ सज्जु हा भांडुपच्या खिंडीपाडा परिसरात राहणारा असून त्याच्यावर वेगवेगळे 18 गुन्हे दाखल आहेत. हा गुन्हेगार अंबरनाथच्या न्यू कॉलनी परिसरात 21 ऑक्टोंबर रोजी एका लहानशा मैदानात अत्यंत ज्वलनशील फटाक्यांची नागरिकांच्या दिशेने आतषबाजी करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.
उपस्थित नागरिकांना गंभीर दुखापत होईल अशी ही आतषबाजी असल्याने नागरिक देखील भयभीत झाले होते दरम्यान या गुन्हेगाराने या धोकादायक फटाक्यांच्या आतषबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकाराची माहिती भांडुप पोलिसांना मिळताच त्यांनी अंबरनाथ पोलिसांची संपर्क साधून याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याचा अंबरनाथ पोलीस शोध घेत आहेत.
Web Summary : A Bhandup criminal, Shahzeb Mallik, with 18 prior offenses, terrorized Ambernath by firing dangerous fireworks at citizens. Police have filed a case; Mallik is absconding.
Web Summary : भांडुप के एक अपराधी शहजाब मल्लिक, जिस पर पहले से 18 अपराध हैं, ने नागरिकों पर खतरनाक पटाखे चलाकर अंबरनाथ में आतंक मचाया। पुलिस ने मामला दर्ज किया; मल्लिक फरार है।