शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

भाईंदर भाजपात बंडाचा वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 01:54 IST

मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार असे भाजपाने जाहीर केले खरे, पण पक्षातील बंडखोरी उफाळून आल्याने

मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार असे भाजपाने जाहीर केले खरे, पण पक्षातील बंडखोरी उफाळून आल्याने आणि नाराजांनी समर्थकांसह निदर्शने सुरू केल्याने अखेर रात्री उशिरापर्यंत यादी प्रसिद्ध झाली नाही. ज्यांना गुपचूप आॅनलाइन भरण्याची सूचना दिली होती, त्यांनाही नंतर अडवण्यात आले. पक्षातील अस्वस्थता पराकोटीची असल्याने भाजपा नेतृत्वाचे धाबे दणाणले आहे.अर्ज बुधवारी दुपारपर्यंत भरायचे आहेत. त्यामुळे मंगळवारची रात्र उमेदवारांच्या निर्णयासाठी, अर्ज भरण्यासाठी मोलाची ठरणार आहे.पक्षाने केलेले सर्वेक्षण, आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेली शिफारस या आधारे ६८ उमेदवारांची यादी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली होती. तिला ते हिरवा कंदिल देतील अशी अपेक्षा होती. थेट उमेदवार निवडीपासून मेहता दूर असले तरी यादीवर त्यांचीच छाप आहे. त्यामुळे मेहता समर्थकांपैकी काहींनी आॅनलाइन अर्ज भरण्यास सुरूवातही केली. उमेदवारांची रितसर यादी जाहीर होण्यापूर्वी त्यांना तशी सूचना देण्यात आली होती. याची कुणकुण लागताच त्या मतदारसंघातील बंडखोर संतापले आणि त्यांनी बंडाचे निशाण फडकावले. निदर्शने केली. हे बंडाचे लोण शहरभर पसरत जाईल, धास्तीपोटी लगोलग नवे निरोप देत काहींचे अर्ज भरणे थांबवण्यात आले.शिवसेनेतून भाजपात आलेले नगरसेवक प्रशांत दळवी यांना प्रभाग २० मधून रविवारी अर्ज भरण्यास सांगितल्याने त्यांनी अर्ज भरला. पण स्थानिक भाजपा नगरसेवक दिनेश जैन व त्यांचे कार्यकर्ते बंडाचा पवित्रा घेत आक्र मक झाले. त्यांना जैन समाजातील व्यक्तींनी पाठिंबा दिला. त्याचवेळी दिनेश जैन यांनी शिवसेनेत जाण्याच्या हालचाली सुरु केल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली. आधीच भाजपाच्या नगरसेविका दीप्ती भट शिवसेनेत गेल्या असताना जैनही गेल्यास प्रभाग २० चे पॅनल धोक्यात येण्याची शक्यता आहे. अखेर दिनेश यांना उमेदवारी अर्ज भरण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आणि प्रशांत दळवी यांना प्रभाग १८ देण्यात आल्याने ते नाराज झाले. उमेदवारी मिळूनही त्यांची कोडी झाली.भार्इंदर पूर्वेच्या प्रभाग २ मधून भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मदन सिंह यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगण्यात न आल्याने ते आणि त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. भाजपाच्या नगरसेविका कल्पना म्हात्रे यांनाही अर्ज भरण्यास सांगितलेले नाही. परंतु त्यांचे वडील तथा ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांना हिरवा कंदील दाखवल्याने त्यांनी अर्ज भरला. महापौरपद इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असून म्हात्रे या प्रमुख दावेदार मानल्या जातात. पण भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिम्पल मेहता यांचे नाव महापौरपदासाठी चर्चेत पुढे असल्याने म्हात्रे यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे . भाजपाचे पाच वेळा नगरसेवक असलेले शरद पाटील यांनाही प्रभाग पाचमधून उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितलेले नाही. प्रभाग १४ मधून भाजपा नगरसेवक अनिल भोसले यांना पण अर्ज भरण्यास सांगण्यात आले नसल्याने ते अस्वस्थ आहेत. या याशिवाय अनेक प्रभागातून विद्यमान नगरसेवकांना किंवा पक्षाने आधी ज्यांना आश्वासन दिले होते त्यांना काहीही न सांगितल्याने ते बंडाच्या पवित्र्यात आहेत.