शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

तीन दिवसांत सीमेवर जाऊ शकतो, या सरसंघचालक वक्तव्यावर स्वयंसेवकांत फूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 11:04 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केवळ तीन दिवसांत प्रशिक्षण घेऊन सीमेवर लढायला जाऊ शकतात, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरून देशभर काहूर माजले असताना ठाणे, डोंबिवली परिसरांतील काही तरुण संघ स्वयंसेवक सीमेवर जाऊन लढण्यास उत्सुक आहेत, तर काहींनी भाजपाचे बहुमताचे सरकार सत्तेत असताना लष्कराबद्दल अविश्वास दाखवणे अयोग्य असल्याचा सूर लावला.

डोंबिवली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक केवळ तीन दिवसांत प्रशिक्षण घेऊन सीमेवर लढायला जाऊ शकतात, या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरून देशभर काहूर माजले असताना ठाणे, डोंबिवली परिसरांतील काही तरुण संघ स्वयंसेवक सीमेवर जाऊन लढण्यास उत्सुक आहेत, तर काहींनी भाजपाचे बहुमताचे सरकार सत्तेत असताना लष्कराबद्दल अविश्वास दाखवणे अयोग्य असल्याचा सूर लावला.गांधी हत्येनंतर आलेली बंदी उठावी, याकरिता संघाने आपण सांस्कृतिक संघटना असल्याचे शपथपत्र दिले आहे. मात्र, तरीही संघाच्या शाखेत लाठ्याकाठ्या चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. बजरंग दल व तत्सम जहाल हिंदुत्ववादी संघटनांमध्ये स्वयंसेवकांना शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते, अशी कुजबुज वर्षानुवर्षे सुरू आहे. भागवत यांनी केलेल्या विधानामुळे संघ ही केवळ सांस्कृतिक संघटना नाही, ही बाब स्पष्ट झाली तसेच स्वयंसेवकांना सीमेवर जाऊन लढण्याकरिता शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते, अशी कबुलीच भागवतांच्या विधानातून दिली आहे.संघाच्या शाखांमध्ये, प्रशिक्षण वर्गांमध्ये मातृभूमी, राष्ट्रप्रेमाचे बाळकडू पाजले जाते. संघात होणारे मैदानी खेळ, सांघिक पद्य, वैयक्तिक पद्य, बौद्धिक यासह प्रशिक्षणातील दंडयुद्ध, नि:युद्ध, सूर्यनमस्कार, कवायत यामधून स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात. संघाच्या प्रशिक्षणवर्गांतील कवायत भारतीय सैन्याच्या परेडची आठवण करून देणारी असते. सातत्याने या उपक्रमांमुळे संघ स्वयंसेवक स्वसंरक्षण करू शकतो, तसेच बौद्धिकांमधून पद्यांमधून त्यांच्यावर चिंतन-मनन करण्याचे धडे आपोआप गिरवले जातात. त्यामुळे आपोआपच स्वयंसेवक राष्ट्रहिताचा विचार करण्यासाठी व वेळप्रसंगी राष्ट्ररक्षणाकरिता सज्ज होतो, असे डोंबिवलीतील एका ज्येष्ठ संघ स्वयंसेवकाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.१५ आॅगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला, तेव्हा संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांनी काश्मीर वाचवण्यासाठी संघ स्वयंसेवकांना रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत संघर्ष करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे भागवत यांचे आवाहन त्याच पठडीतील असल्याचे स्वयंसेवकांचे म्हणणे आहे. आपत्कालीन परिस्थितीत संघाचे स्वयंसेवक साहाय्यासाठी सरसावले आहेत. संघाच्या शिबिरांमध्येही अनेकदा आपत्कालीन परिस्थितीचे धडे देण्यासाठी ‘डेंजर कॉल’ दिला जातो. अचानक शिट्या वाजवल्या जातात. राहुटीमधले स्वयंसेवक धावाधाव करतात. मैदानात एकत्र येतात. आपत्कालीन स्थितीत काय पवित्रा घ्यावा, याचे प्रशिक्षण दिले जाते.खडबडीत जमिनीवरच झोपणे, जेवायला बसणे, स्वत:चे पांघरूण आवरणे, जेवणाचे ताट स्वत: धुणे, अंघोळीची सोय असल्यास कपडे धुणे, स्वत:चे सामान स्वत: सांभाळणे, तंबूतील सहकाºयांची काळजी घेणे, हे संस्कार देतात. रात्री व दिवसभराच्या पहाºयासाठी स्वयंसेवकांनाच तयार केले जाते. दोनदोन तासांकरिता चमूने हद्दीचे संरक्षण करायचे, असे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, संघ स्वयंसेवकांना कोणकोणती शस्त्रास्त्रे चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्यामध्ये रिव्हॉल्व्हर, रायफल अशा लष्कर किंवा पोलीस वापरत असलेल्या शस्त्रांचा समावेश असतो का, याबाबत स्वयंसेवकांनी चुप्पी साधली.सोशल मीडियावर मात्र दोन गटरा.स्व. संघाच्या ब्राह्मण समूहाचा समावेश असलेल्या एकदोन व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर भागवतांच्या विधानाबद्दल परस्परविरोधी मते व्यक्त झाली. ग्रुप सदस्यांमध्ये दिवसभर घमासान चर्चा झाली. काहींनी भागवतांची बाजू उचलून धरली, तर काहींनी आपले (भाजपाचे) बहुमताचे सरकार सत्तेवर असताना लष्करावर अविश्वास दाखवणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले.केवळ सीमेवर जाऊन रक्षा करणे म्हणजे राष्ट्रीयत्व नसते. ते जळीस्थळी जपावे लागते. संघाने नेहमीच तशी शिकवण दिलेली असते. त्यासाठी वेगळ्या प्रशिक्षणाची गरज नसते.- प्रमोद बापट, प्रचार प्रसिद्धिप्रमुख, कोकणप्रांत, रा. स्व.संघराष्ट्रोत्थान या पुस्तिकेत सरसंघचालकांच्या मुलाखतीत एका सैन्याच्या अधिकाºयानेच दिलेल्या माहितीनुसार संघाच्या तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवकास सैन्याचे प्रशिक्षण देणे सोपे जाऊ शकते. कारण, वर्षानुवर्षे सततच्या संस्कारांमुळे सैन्य दलात जसे रफटफ काम असते, त्याची सवय स्वयंसेवकांना झालेली असते. त्यामुळे सहनशक्ती, कठोर अनुशासन हे सगळे स्वयंसेवकांमध्ये सहज दिसून येते. - कुणाल मानकामे, महाविद्यालयीन विद्यार्थी, पनवेलखरेतर, अशी वेळ येऊ नये. पण, जर राष्ट्र संकटात असेल, तर मात्र आम्ही नक्कीच मातृभूमीसाठी सज्ज होऊ.- गौरव पवार, सॉफ्टवेअर अभियंता, पनवेलसरसंघचालक भागवतांनी जे व्यक्तव्य केले आहे, ते पूर्ण ऐकणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, संघामध्ये सैन्यासारखी शिस्त, अनुशासन असते. ते खरेच आहे. संघाच्या पद्यासह बौद्धिकांमध्ये राष्ट्रप्रेम, मातृभूमीलाच प्राधान्य देण्यात आले आहे. ‘हम करे राष्ट्र आराधन’ असो की, संघाची ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ ही प्रार्थना असो, त्याचा अभ्यास केल्यास भारतमातेला परमवैभव प्राप्त व्हावे, हीच मागणी केली आहे.- अर्जुन भाबड, कल्याण जिल्हा संयोजक, बजरंग दलसंघामध्ये शिस्तीला प्राधान्य दिले जाते. ती खूप महत्त्वाची असते. सैन्यामध्येही तेच आवश्यक असते. स्वयंअनुशासनाने बराच फरक पडतो. ते संघाच्या प्रत्येक संस्कारांतून आपोआप मिळते. त्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नसते. त्यामुळे सैन्यामध्ये संघ स्वयंसेवक अल्पावधीतच रुळू शकतो. राष्ट्रप्रेमाखातर अडीअडचणींची त्याला सवय असते. - रोहन शिंदे,मेकॅनिकल अभियंता, ठाणेमला सैन्यातच जायचे होते, पण ते शक्य झाले नाही. संघामध्ये स्वयंसेवकांची मानसिकता राष्ट्रभक्तीसाठी तयार झालेली असते. त्यामुळे जर तशी स्थिती आली, तर आम्ही निश्चितच तयार आहोत.- चंद्रकांत मोरे, सॉफ्टवेअर अभियंता, ठाणेसंघाने नेहमीच भारताला सहकार्य केले आहे. देशातील आतंकवादाला थोपवण्यासाठी संघ स्वत:च्या जोरावर विशेष प्रयत्न करणार असेल, तर ते सैन्याला पूरकच आहे. जर संघाने हाक दिली, तर आम्ही राष्ट्रासाठी नक्कीच पुढे येऊ.- कौस्तुभ पालये, कला शाखेचा विद्यार्थी, खोपट-ठाणेराष्ट्रभक्तीला संघाने नेहमी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जर देशाला गरज पडली, तर आम्ही सैन्याला साहाय्य करणार. प्रत्यक्ष सैन्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी काहीसा अवधी जाईल. पण, सरसंघचालकांनी आवाहन केल्यास तीन दिवसांत नक्कीच मानसिकता तयार होऊ शकते.-अथर्व थत्ते,टेकडीबंगला, ठाणे

टॅग्स :dombivaliडोंबिवलीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ