शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 21:29 IST

महाविद्यालयातील मैत्रिणीशी जवळीक साधल्यानंतर ती घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावरच लैंगिक अत्याचार करणा-या प्रथमेश बाबर याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्दे महाविद्यालयातील मैत्रिचा घेतला गैरफायदागरोदर राहिल्याने प्रकार उघडकीसकासारवडवली पोलिसांनी केली कारवाई

ठाणे : महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर गेल्या चार महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती करणा-या प्रथमेश महादेव बाबर (१९, रा. घोडबंदर रोड, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.पीडित तरुणी १८ वर्षांची असून ती आणि आरोपी प्रथमेश हे दोघेही ठाण्यातील एकाच महाविद्यालयात शिकतात. ती घोडबंदर रोड भागात तर तो मानपाड्यातील शिवाजीनगर भागात वास्तव्याला आहे. दोघांमध्येही चांगली मैत्री आहे. तिचा फायदा घेऊन जुलै २०१८ ते ६ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत त्याने तिचा विरोध डावलून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. घरातील मंडळी बाहेर गेल्यानंतर तो तिच्या घरी वेगवेगळ्या बहाण्याने यायचा. त्याचवेळी त्याने हे कृत्य केले. आईवडिल रागावतील म्हणून तिने घरातही हा प्रकार सांगितला नाही. मात्र, आठवड्यापूर्वी तिला पोटात त्रास झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यावेळी आपल्याच मित्राने अत्याचार केल्याची माहिती तिने कुटूंबियांना दिली. तिच्या पालकांनी आणि तिने याप्रकरणी २२ आॅक्टोबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले आणि पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांच्या पथकाने त्याला अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कार