शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! येऊरच्या जंगलात पाच बिंबट्यांचा मुक्त संचार; १५२ पशूपक्षी, वन्यप्राण्यांचा वावर!

By सुरेश लोखंडे | Updated: May 24, 2024 22:18 IST

येऊर प्रमाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तनसा अभयारण्य, माळशेज घाट परिसरात रात्री वन्यजीव, पशुपक्षी, प्राणी गणना करण्यात आली आहे.

ठाणे : या स्मार्ट सिटीच्या शहराला लागून असलेल्या संजय गांधीं राष्ट्रीय उद्यान, येऊरच्या जंगलातील १२ पाणवठे, डोह, झर्यांच्या ठिकाणी  रात्रीच्या वेळी पाणी पिण्यासाठी येणार्या वन्यजीव पाण्यांची गणना ४२ वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून केलली. त्यात तब्बल पाच बिबट्यांचा या जंगलात मुक्त संचार आढळून आला असून हरीण,सांबर,माकड, ससा, रान डुक्कर, साळींद, मांजरी आदी १५२ वन्यजीव, प्राण्यांचा वावर अल्याची नोंद वनाधिकारी, कर्मचारी, वन्यजीव प्रेमींनी मचाण सर्वेक्षणाद्वारे केली आहे. शहराजवळील येऊरचे जंगल हे निसर्गाचे वरदान ठाणेकरांना लाभले आहे. विविध रंगीबेरंगी पाना फुलांची वनसंपदा, औषधी वनस्पती, वेली आदींनी नटलेल्या या येऊरच्या जंगलात मनसोक्त वावरणारे, वन्यजीव प्राणी,पशूपक्षी जंगलातील पाणवठ्यांवर रोज रात्री पाणी पिण्यासाठी येतात. दिवसभराच्या  कडकडीत उन्हामुळे तहानेने व्याकूळ झालेले पशूपक्षी, वन्यजीव प्राणी रात्रीच्या अंधाराचा सहारा घेऊन पाणी पिण्यासाठी पाणवठ्यांवर येतात. आजच्या बुद्धंपौर्णिमेच्या चांण्यामध्ये ते रात्री स्पष्ट दिसतात. त्यांमुळे वनविभागाकडून गुरवारी बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्या रात्री वन्यजीव, पशुपक्षी गणना करण्यात आली आहे. येऊर प्रमाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तनसा अभयारण्य, माळशेज घाट परिसरात रात्री वन्यजीव, पशुपक्षी, प्राणी गणना करण्यात आली आहे.

येऊरच्या जंगलातील ठिकठिकाणच्या पाणवठ्याच्या काही अंतरावरील  झाडांवर मचाण बांधून त्याव ४२ वनाधिकारी, वनपाल, वनरक्षक तैनात करून त्यांच्या कडून दुर्बिणीच्या सहाय्याने पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांची, पशूपक्षांची नोंद रात्रभर करण्यात आली,असे येऊरचे वनाधिकारी संजय सोनटक्के यांनी लोकमतला सांगितले. ----------

या पाणवठ्यांजवळ मचाण उभारून झाली वन्यजीव,प्राणी गणना- 

 घोडबंदरजवळील करंदीचे पाणी, येथील मचाणावर , वनरक्षक प्रितमकुमार वडजकर यांचे पथक,  याच परिसरातील काशीजवळील वळकुंडीचे पाणी येथे लपणकुटी उभारून त्यातून गणना करण्यात आली. चेणा पूर्व भागात टाकाचा नाला, चेणा पश्चिमेला आंब्याचे पाणी, ओवळा परिसरात कुंडाचा नाला, येऊर पश्चिमेला हुमायुन बंधारा, येऊर पुर्वेला चिखलाचे पाणी, कावेसर महेंद्राचे पाणी,  पाचपाखाडीजांभळीचे पाणी, नागला भागातील, करवेलचे पाणी सारजामोरी येथील तलवळीचे पाणी

----------------

येऊर परिक्षेत्राकडील गुरुवारी रात्री  पाणवठ्यावरील वन्यप्राणी गणना केली असता या पशूपक्षी, वन्यजीव प्राण्यांंची नोंद झाली 

वन्यप्राणी  - संख्या 

विवटया - ५सांबर - १५ 

रान-डुक्कर - ६

लंगूर - २२

रान-कोंबडा - ५

लालतोंडी- १५

ससा- ९ 

वट-वाघुळ- २१

घुवड- ६

मुगुंस - ३

माकड -४०

साळींदर-३

धामण - १

रानमांजर - २

टॅग्स :thaneठाणे