शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

कर्जबाजारीपणाला कंटाळून सुताराची खाडीत उडी घेऊन आत्महत्या; फादर्स डेला मुले पाेरकी

By जितेंद्र कालेकर | Updated: June 16, 2024 20:19 IST

कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा: शोध कार्य राबवून अग्निशमन दलाने खाडीतून काढला मृतदेह

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: दोन खासगी वित्तीय संस्थांचे कर्ज झाल्याने त्याची परतफेड कशी करायची या विवंचनेत असलेल्या श्रवण उर्फ बबलू विश्वकर्मा (३५, रा. इंदिरानगर, वागळे इस्टेट, ठाणे) या फर्निचर दुरुस्ती करणाऱ्या कारागिराने साकेत जवळील खाडीत स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सात ते आठ तास खाडीच्या पाण्यात शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली.

कळव्याच्या साकेत ब्रिजवर स्वत:ची मोटारसायकल उभी करुन नंतर त्याच ब्रिजवरुन खाली खाडीच्या पाण्यात बबलू याने १५ जून रोजी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास उडी ष्घेतली. ही माहिती कळवा पोलिसांकडून मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांकडून तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाºयांकडून रात्री ७ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास खाडीच्या पाण्यात शोध कार्य राबविण्यात आले. मात्र, रात्रीचा अंधार असल्याने खाडीमध्ये शोधकार्य करणेशक्य नसल्याने शनिवारी रात्री हे शोधकार्य तात्पुरते थांबविण्यात आले होते. त्यानंतर १६ जून रोजी सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या दरम्यान पुन्हा चार तास शोधकार्य राबविण्यात आले. नविन कळवा ब्रिजजवळ अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना त्याचा मृतदेह आढळला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

फादर्स डेला मुले झाली पित्याला पाेरकी-

शनिवारी उडी घेण्यापूर्वी बबलू याने कर्जामुळे पत्नी रिंकू (३०) हिच्याजवळ हतबलता व्यक्त केली होती. यात दोष्घांमध्ये वादही झाला होता. त्यांना एक १५ वर्षांचा मुलगा आणि १२ वर्षांचे मुलगा आणि एक मुलगी ही जुळी अशी तीन मुले आहेत. जगभरात रविवारी फादर्स डे साजरा हाेत असतांना बबलूची मुले मात्र त्यांच्या पित्याला पाेरकी झाल्याचे हळहळ व्यक्त हाेत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी