शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

मॅरेथॉन मार्गावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 04:47 IST

ठाणे महापालिका प्रशासन लागले कामाला : पाऊस ठरतोय अडथळा

ठाणे : येत्या २ सप्टेंबर रोजी होणारी २९वी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खड्डेमुक्त पार पडावी या उद्देशाने महापालिकेने विविध मार्गांनी ते बुजविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दिवसरात्र काम करून हे काम करण्यात येत असले तरी पावसाचा अडथळा निर्माण होत असल्याने खड्डे बुजविण्याच्या प्रक्रियेला काहीशी खीळ बसत आहे.

येत्या २ सप्टेंबर रोजी २९वी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा रंगणार आहे. दरवर्षी या स्पर्धेत २० ते २५ हजार स्पर्धक सहभागी होत असतात. त्यामुळे या स्पर्धकांना खड्डेमुक्त प्रवास करून ती स्पर्धा नियोजनबद्ध पार पडावी यासाठी शुक्रवारी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी खड्ड्यांची पाहणी केली असता, प्रत्येक मार्गावर त्यांना खड्डेच खड्डे दिसून आले. घोडबंदरचा सर्व्हिस रस्ता तर पूर्णपणे उखडला असून काही ठिकाणी पाण्याच्या वाहिन्या फुटून केबल वर आल्या आहेत. त्यामुळे या मार्गांवर स्पर्धकांनी धावायचे कसे, असा सवालच करून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच या मार्गावरील वागळे डेपो, साठेनगर, इंदिरानगर चौक, सावरकर नगर, कोरस चौक, रुनवाल, देवदया ते नीलकंठ, पोखरण रोड नं. २, मानपाडा सेवा रस्ता, हिरानंदानी इस्टेट प्रवेशद्वार आदी सर्वच ठिकाणी खड्ड्यांचे जाळे पसरले आहे.दरम्यान, आता शनिवारपासून लागलीच खड्डे बुजविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. घोडबंदर सर्व्हिस रोडवरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. त्यामुळे काही वेळेसाठी येथील रस्ता बंद ठेवला होता. तसेच इतर मॅरेथॉन मार्गांवरील इतर ठिकाणचे खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग आला आहे.परंतु, पावसाचा अडसर येत असल्याने पालिकेची तारेवरची कसरत सुरू झाली आहे. रस्ते बुजविताना काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रिट, डांबराचा वापर केला जात आहे. मॅरेथॉन स्पर्धेपूर्वी ते बुजविले जातील, असा दावा प्रशासनाने केला आहे.खड्डे भरण्यासाठी आयुक्त पुन्हा रस्त्यावरच्सोमवारी आयुक्त संजीव जयस्वाल हे स्वत: रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. मुंब्रा बायपास बंद झाल्याने शहरातील वाहतुकीवर जास्तीचा ताण आला आहे.च्तसेच पावसाने सुद्धा उघडीप न घेतल्याने खड्डे बुजविण्यास विलंब होत आहे. परंतु आता मॅरेथॉन स्पर्धा असल्याने खड्डे बुजविण्याची प्रक्रिया वेगात सुरू केल्याची माहिती यावेळी आयुक्तांनी दिली.च्खड्डे बुजविण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञांनाचा वापर केला जात आहे. अमेरीकन तंत्रज्ञानाचा वापर हा प्रायोगिक तत्त्वावर केला गेला आहे. तो यशस्वी झाला तर पुढील निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाthaneठाणे