शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदर रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण होणार; आ. मेहतांसह पालिका अधिकाऱ्यांनी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 20:06 IST

भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील उत्तर दिशेच्या परिसराचे सुशोभीकरण भव्य प्रवेशद्वाराच्या माध्यमातून लवकरच करण्यात येणार आहे.

राजू काळेभार्इंदर - भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील उत्तर दिशेच्या परिसराचे सुशोभीकरण भव्य प्रवेशद्वाराच्या माध्यमातून लवकरच करण्यात येणार आहे. तत्पूर्वी भाजपा आ. नरेंद्र मेहता यांच्यासह पालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी त्या परिसराची पाहणी केली.या नियोजित सुशोभिकरणासाठी आ. मेहता यांच्या प्रयत्नाने राज्य सरकारकडून २ कोटींचा विशेष निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीतून भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील उत्तर दिशेला भव्य एकमजली प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे. या प्रवेशद्वाराची लांबी २२० फूट तर रुंदी ३० फूट इतकी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना मेहता यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.या नियोजित प्रवेशद्वारामुळे रेल्वे परिसराचा लूक बदलणार असला तरी तेथील रिक्षास्टॅन्ड, बस थांबे, त्यांच्यासह खासगी वाहतुकीची रेलचेल, लगतच्या मासळी बाजार व लोकवस्तीतील रहिवाशांच्या वर्दळीमुळे होणारी वाहतुक कोंडी त्यामुळे सुटणार का, असा प्रश्न रेल्वे प्रवाशांकडुन उपस्थित होऊ लागला आहे. यात प्रामुख्याने म्हणजे नियोजित प्रवेशद्वाराची जागा रेल्वेच्या मालकीची असुन रेल्वे प्रशासन त्याच्या बांधकामाला सहज परवानगी देईल का, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यापूर्वीच रेल्वे मार्गाखालून बांधलेल्या भुयारी मार्गाच्या परवानगीपोटी रेल्वे प्रशासनाने पालिकेकडून कोट्यवधींचे शुल्क वसूल केले आहे. त्यामुळे या नियोजित प्रवेशद्वाराच्या परवानगीसाठी देखील रेल्वेकडून विविध शुल्काची मागणी केली जाऊ शकते, असा कयास प्रशासनाकडून लावला जात आहे. त्यामुळे हे प्रवेशद्वार अत्यावश्यक नसल्याचा सूर नागरिकांकडून आळवला जात आहे.एका बाजूला शहरातील अनेक विकासकामे प्रलंबित तसेच सरकारी लालफितीत अडकली असताना केवळ रेल्वे परिसराचे सुशोभीकरण करण्याचा सपाटा लावण्यात आर्थिक नुकसान करण्यासारखे असल्याचा दावा केला जात आहे. यापूर्वी २० आॅक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीरा रोड रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले. यानंतर भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे डोहाळे सत्ताधा-यांना लागल्याचे दिसून येत असल्याचा आरोप केला जात आहे. परंतु या स्थानक परिसरातील बेकायदेशीर फेरीवाले, वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते व पर्यायी रस्त्यांचा अभाव आदी समस्या जैसे थे असताना केवळ परिसराचे सुशोभीकरण करून शहराचा विकास काय कामाचा? असा दावा केला जात असला तरी शहरातील सौंदर्यात मात्र नियोजित सुशोभीकरणामुळे भर पडणार असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर