शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉटसअ‍ॅप’वरील माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी घडविली पिता पुत्राची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 17:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एका व्हॉटसअ‍ॅप गृपवर मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने अवघ्या १३ ...

ठळक मुद्दे गतिमंद मुलगा पुन्हा मिळाल्याने पालकांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका व्हॉटसअ‍ॅप गृपवर मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने अवघ्या १३ वर्षीय मुलाला त्याच्या वडिलांची महिनाभराने भेट घडवून आणली. नालासोपाºयातून अचानक बेपत्ता झालेला आपला मुलगा पुन्हा सुखरुपपणे मिळाल्यामुळे या मुलाच्या पालकांच्या चेहºयावर समाधानाची ‘मुस्कान’ दिसून आली.सध्या ठाणे शहर पोलिसांच्या चाईल्ड प्रोटेक्शन युनिटच्या मार्फतीने ‘मुस्कान -९’ ही लहान मुलांना शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका व्हॉटसअ‍ॅप ग्रृपवर या गतिमंद विशेष मुलाची त्रोटक माहिती २८ नोव्हेंबर २०२० रोजी मिळाल्यानंतर अवघ्या चारच तासांमध्ये त्याची आणि त्याच्या वडिलांची भेट घडविण्यात या पथकाला यश आले.सलीम (नावात बदल) लहान असतांनाच त्याच्या आईचे निधन झाले. लॉकडाऊन संपल्यानंतर बेकरीत काम करणाºया त्याच्या वडिलांनी २८ आॅक्टोबर २०२० रोजी त्याला गावावरुन नालासोपाºयामध्ये आणले. ते त्याला घरारत ठेवून कामाला जात होते. त्याचदरम्यान, तो घरातून अचानक बेपत्ता झाला. याबाबत ७ नोव्हेंबर रोजी त्याच्या वडिलांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर १२ नोव्हेंबर रोजी तो कल्याण येथील खडकपाडा पोलिसांना आढळून आला. त्याच्याकडून पुरेशी माहिती न मिळाल्याने पोलिसांनी त्याला उल्हासनगर बालसुधारगृहात दाखल केले. २८ नोव्हेंबर रोजी ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटला एका व्हॉटसअ‍ॅप ग्रृपवर त्याची माहिती मिळाली. यामध्ये त्याचा लहानपणीचा जुना फोटो आणि केवळ नालासोपारा इतक्याच त्रोटक माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने यांच्या पथकातील पोलीस हवालदार भाऊसाहेब शिंगारे आणि पोलीस नाईक प्रमोद पालांडे यांनी त्याचा उल्हासनगरच्या बालसुधारगृहात शोध घेतला. अवघ्या चार तासात शोध पूर्ण करुन सलीमला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. तो गतिमंद असून त्याचा शोध घेण्यासाठी त्याचे वडील रिक्षाने मुंबईत फिरत ४ डिसेंबर रोजी माटुंगा येथे आले होते. त्याचवेळी ठाणे चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने त्यांना मुलाची माहिती दिली. मुलाचा लहानपणीचा जुना फोटो त्यांनी पोलिसांकडे दिला होता. त्याचवेळी मुलाने बालसुधारगृहामध्ये चुकीचे नाव दिले. अशी संभ्रमाची माहिती असतांनाही या मुलाला सुखरूप त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात या पथकाला यश आले. आपला मुलगा सुखरुपरित्या परत मिळाल्याने मुलाच्या वडिलांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले आहेत.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMissingबेपत्ता होणं