शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथच्या चिखलोली धरणाने गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:48 IST

जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल इतकाच साठा, पाणी जपून वारण्याचे आवाहन

अंबरनाथ : अंबरनाथ पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणातील पाणीसाठा जलद गतीने कमी होत आहे. १५ जूनपर्यंत पाणी पुरवणे शक्य होईल, असे नियोजन केले जात आहे. मात्र, धरणातील पाणीसाठा लक्षात घेता हे पाणी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार आहे. त्यामुळे आतापासूनच पर्यायी पाण्याची व्यवस्था तसेच एमआयडीसीच्या मंजूर पाणीकोट्यातील पाणी हे अंबरनाथ पूर्व भागासाठी वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.अंबरनाथ शहराला उल्हास नदी आणि चिखलोली धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. चिखलोली धरणातील सहा दशलक्ष लीटर पाणी दररोज पूर्व भागात वितरित करण्यात येत आहे. मात्र, उन्हाचा कडाका वाढल्याने आणि पाण्याची पातळी जास्त खालवत चालल्याने या धरणातील पाणीसाठा जून महिन्यापर्यंत उपलब्ध होईल, असे नियोजन केले जात आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून मिळणाºया पाण्यावर जास्त भर दिला जात आहे. चिखलोली धरणाची पातळी ही खालावत असल्याने या पाण्यावर जास्त दिवस अवलंबून राहणे शक्य होणार नाही. त्यातच, गेल्या वर्षीप्रमाणे पाण्यात रासायनिक द्रव्यांचे प्रमाण आढळल्यास ऐन मे महिन्यात नागरिकांची पाण्यामुळे कोंडी होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही भागांसाठी एमआयडीसीचे पाणी घेतले जाते. त्यामुळे या पाण्याचे नियोजन जीवन प्राधिकरणाने आतापासूनच सुरू ठेवले आहे. पाण्यामध्ये रासायनिक द्रव्यांचे प्रमाण आढळल्याने गेल्या वर्षी या धरणातील पाणी न उचलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.यंदा एमआयडीसी भागातील कंपन्यांचे रासायनिक द्रव्य जाणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे. मात्र, तरीही धरणातील पाणी दूषित झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे. धरणाची पाण्याची पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त खालावल्याने या पाण्याचेही नियोजन करूनच आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई