शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील बार आणि रेस्टॉरेन्ट्स रात्री ११.३० पर्यंत राहणार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 20:03 IST

Thane News : शहरातील हॉटेल, बार असोसिएशनने केलेल्या मागणीनंतर आता ठाणे महापालिकेने १० ऑक्टोबर सकाळी ७ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत  सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे - मिशन बिगेन अंतर्गत ५ ऑक्टोबर पासून शहरातील हॉटेल, बार, रेस्टॉरेन्ट सकाळी ९ ते सांयकाळी ७ वाजेर्पयत सुरु करण्यात आली. परंतु शहरातील हॉटेल, बार असोसिएशनने केलेल्या मागणीनंतर आता ठाणे महापालिकेने १० ऑक्टोबर सकाळी ७ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत  सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता चल रे बसू असे म्हणत मद्यपींची यामुळे चंगळ होणार आहे. परंतु हॉटस्पॉटमध्ये मात्र ही परवानगी नाकारण्यात आली आहे.शहरातील हॉटेल, बार, फुडकोर्ट, रेस्टॉरेन्ट हे ५ ऑक्टोबर पासून सुरु झाले होते. परंतु ठाण्यातील केवळ १० टक्केच बार या दिवशी सुरु झाले होते. तसेच या हॉटेल आणि बारवाल्यांचा खरा व्यावसाय हा सांयकाळी ७ नंतर सुरु होत आहे. त्यामुळे त्यानुसार बार असोसिएशनने या बाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिष्ठ मंडळाने महापालिका आयुक्तांची देखील भेट घेतली होती. या भेटीनंतर आता १० ऑक्टोबर पासून हॉटेल, बार यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. महापालिकेने या संदर्भातील आदेश काढला आहे. त्याची अंमलबजावणी आता आजपासूनच होणार असल्याचे या आदेशात नमुद करण्यात आले आहे. त्यानुसार आता ठाण्यातील हॉटेल, बार, रेस्टॉरेन्ट आज पासून सकाळी ७ ते रात्री ११.३० र्पयत सुरु राहणार आहेत.यामध्ये ठाण्यातील १८ हॉटस्पॉटमधील बंधने आजही कायम ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार या हॉटस्पॉटमधील हॉटेल, बार, रेस्टॉरेन्ट सुरु ठेवली जाणार नसल्याचेही पालिकेने स्पष्ट केले. परंतु तरी देखील हॉटस्पॉटमध्ये हॉटेल, बार सुरु असल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशाराही पालिकेने या आदेशात दिला आहे.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक