शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

नाईकांच्या बालेकिल्ल्यात संभाव्य उमेदवारीचे बॅनर, महायुतीत ठाणे लाेकसभा मिळणार कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 09:06 IST

Thane Lok Sabha Constituency: लोकसभा कुणी लढवायची, यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला कलगीतुरा रंगत आहे. भाजपकडून अनेक नावांची चर्चा सुरू असताना आता शिवसेनेने या मतदारसंघावरील दावा पक्का केला.

ठाणे  - लोकसभा कुणी लढवायची, यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेला कलगीतुरा रंगत आहे. भाजपकडून अनेक नावांची चर्चा सुरू असताना आता शिवसेनेने या मतदारसंघावरील दावा पक्का केला. शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांच्याकडून ठाण्यात नव्हे तर नवी मुंबईतही बॅनरबाजी करण्यात आली. ठाणे लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या पारड्यात पडणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबत मागील काही महिन्यांपासून शिवसेना आणि भाजपकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. भाजप हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी अनेकांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. 

माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी राम मंदिर उद्घाटनानिमित्ताने तीन दिवसांचा भरगच्च कार्यक्रम आयोजित केला होता. शिवसेनेकडून मांसुदा तलावाच्या ठिकाणी महाआरती आयोजित केली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर स्वच्छतेचे आवाहन करताच त्याची सुरुवात शिवसेनेने ठाण्यात प्रथम करण्यात आली.

कोणाची वर्णी लागणारआता नरेश म्हस्के यांच्या समर्थकांनी केवळ ठाण्यातच नव्हे तर नवी मुंबईतही बॅनरबाजी करून लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक संजीव नाईक यांच्यासह नाईक कुटुंबाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला.भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे आणि संजीव नाईक यांच्या नावांची लोकसभेकरिता चर्चा आहे.सेनेकडून आमदार प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्के यांची नावे आघाडीवर आहेत. यात कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :thane-pcठाणेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा