शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

खोटी कागदपत्रे रंगवून कर्जे घेतल्याप्रकरणी बँकेने थकबाकीदारांवर केला गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 20:15 IST

४० लाख ६१ हजाराचे कर्ज घेऊन त्यापैकी सुमारे १७ लाख रुपयांची थकबाकी केल्याप्रकरणी दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकांनी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी- शहरातील तीन जणांनी वाहन खरेदीसाठी घेतलेले कर्ज घेण्यासाठी बँकेत खोटी कागदपत्रे सादर करून सुमारे ४० लाख ६१ हजाराचे कर्ज घेऊन त्यापैकी सुमारे १७ लाख रुपयांची थकबाकी केल्याप्रकरणी दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकांनी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.ठाण्यातील घोडबंदर रोडवरील लोकनिसर्ग मार्केट व शहरातील अमीना कंपाऊण्डमध्ये असलेल्या बालाजी मोटर्समधून वाहने खरेदी करण्याच्या हेतूने ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून सन २०११-१२दरम्यान सतीश चक्रमानी गांडला, रामकृष्ण चक्रपाणी गांडला,शशांक चंद्रशेखर वडके, रोहन सुभाष भांगरे यांनी एकूण ४० लाख ६१ हजार रुपयांचे कर्ज घेतले. या तिघांनी कोणतेही वाहन खरेदा न करता घेतलेल्या कर्जाच्या रकमेपैकी त्यांनी २३ लाख ५५ हजार ६२२ रुपयांचे कर्ज भरले.तसेच आपसांत संगनमत करून आरटीओकडून देण्यात येणारे व शासकीय दप्तर असलेले आरसीबुक, टॅक्स सर्टिफिकेट, इन्शुरन्सची कागदपत्रे हे बनावट बनवून त्यावर बँकेचे हायपोथिकेशन कर्ज असल्याचे भासविले आणि बँकेची व्याजासह १७ लाख ०५ हजार ३७८ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार बँकेचे व्यवस्थापक अनिल मोतीराम पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार कर्जदारांसह जामीनदार विनोद मोरे, संजय गमरे, चंद्रशेखर मगर, संतोष पवार, बालाजी चेट्टीयाल, मोनीष भोईर व वाहन डिलर बालाजी मोटर्स असा एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीbankबँक