शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

गंडा घालणारा भामटा गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 06:43 IST

परदेशात जहाजावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्यास मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याविरोधात नवी मुंबई, केरळ येथेही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. फसवणूक करून मिळालेल्या पैशांचा वापर तो पब, बारमध्ये अय्याशीसाठी करत असल्याचे उघड झाले.

मीरा रोड : परदेशात जहाजावर गलेलठ्ठ पगाराची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्यास मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे. या भामट्याविरोधात नवी मुंबई, केरळ येथेही फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. फसवणूक करून मिळालेल्या पैशांचा वापर तो पब, बारमध्ये अय्याशीसाठी करत असल्याचे उघड झाले.मीरा रोडमध्ये राहणारे परिमल पटेल यांचा इस्टेट एजंटचा व्यवसाय असून त्यांचा मुलगा आकाश (१९) हा परदेशात जहाजावर नोकरी शोधत होता. इंटरनेटवर त्याला परदेशात जहाजावर नोकरी लावणाºया काही एजंटचे नंबर मिळाले. त्याने व वडिलांनी अनेकांशी संपर्क साधला असता त्यातच जस्ट डायलवरून त्यांना सोमय्या रंजन मिश्रा (२६) या एजंटचा क्रमांक मिळाला. मिश्रा याने श्रीलंकेत एका जहाजावर नोकरीसाठी मोठ्या पगाराचे आमिष दाखवून १० लाखांचा खर्च सांगितला. पण, तडजोडीत अखेर पाच लाखांत काम करून देण्याचे दोघांचे ठरले.मिश्राने आकाश याचे विमानाचे तिकीट, व्हिसा, नियुक्तीपत्र आदी सर्व दिले. २० एप्रिलला आकाश विमानतळावर जाईपर्यंत मिश्रा याने पैसे घेतले. पटेल यांनीदेखील नोकरीचे काम होते, म्हणून मिश्राला चार लाख ६० हजार टप्प्याटप्प्याने दिले. मिश्राने सांगितल्याप्रमाणे आकाश हा कोलंबो येथे पोहोचला असता तेथे दुसरा एजंट भेटला. पण, त्या एजंटकडे चौकशी केली असता मिश्राने सांगितलेल्या नावाचे कोणतेच जहाज नसल्याचे आकाशला समजले. घडलेला प्रकार आकाशने वडिलांना सांगितला असता त्यांनी मीरा रोड पोलीस ठाणे गाठले.पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यावर निरीक्षक वसंत लब्धे यांच्या मार्गदर्शनाखाली पटेल यांना मिश्राशी संपर्क साधायला सांगितले. पटेल यांनी संपर्क केला असता मिश्रा याने दुसºया जहाजावर नोकरी मिळवून देतो, असे सांगत आणखी पैसे लागतील, तोपर्यंत आकाशला तेथेच राहू द्या, कंपनी खर्च करेल, असे सांगितले. मिश्रा हा पैसे घेण्यासाठी मीरा रोड येथे आला असताना पोलिसांनी त्याला अटक केली.दरम्यान, कोलंबो येथे आकाशला अन्सूल राणा हा मिश्राकडूनच फसला गेलेला आणखी एक तरुण सापडला. दोघांनी मुंबई गाठून मीरा रोड पोलिसांना सर्व प्रकार सांगितला.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCrimeगुन्हा