शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

मतपेट्यांची पळवापळवी, प्रभाग ३ मध्ये मतपेट्यांची बस धरली रोखून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 23:41 IST

 मानपाडा येथील प्रभाग क्रमांक तीन हा मतदार संघ सुरुवातीपासूनच यंदाच्या महापालिका निवडणुकीत गाजत आहे. कधी राजीनामा नाट्य तर  कधी वादग्रस्त ऑडिओ क्लिप  यावरून हा प्रभाग यंदाच्या निवडणुकीत चांगलाच गाजला होता.

ठाणे : ठाण्यात मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री मतपेट्यांचा काहीसा घोळ झाल्याचे शहरातील काही भागात दिसून आले. प्रभाग क्रमांक१ मध्ये कोणत्याही बंदोबस्त शिवाय मतपेट्या घेऊन जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. तिकडे प्रभाग ३ मध्ये सेंट जेव्हीयर्स शाळेतून मतपेट्या घेऊन जाणारी बस शिंदे सेनेच्या उमेदवारांनी रोखून धरल्याने येथे अर्धा तासाहून अधिक काळ काहीसा गोंधळ दिसून आला. 

   मानपाडा येथील प्रभाग क्रमांक तीन हा मतदार संघ सुरुवातीपासूनच यंदाच्या महापालिका निवडणुकीत गाजत आहे. कधी राजीनामा नाट्य तर  कधी वादग्रस्त ऑडिओ क्लिप  यावरून हा प्रभाग यंदाच्या निवडणुकीत चांगलाच गाजला होता. गुरुवारी रात्री मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन वाहनातून मतदान मोजणी केंद्रात घेऊन जात होते. त्यावेळी  या वाहनात अपक्ष उमेदवार असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

तसेच त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी  ईव्हीएम मशीन घेऊन जाणारे वाहन रोखून धरले. यामुळे येथे  मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. तसेच दोन अपक्ष उमेदवारांना ही कोंडून ठेवले. या घटनेची माहिती मिळतात पोलीसही त्वरित तिथे पोहचले. पाऊण तास मतपेट्यांची बस रोखून धरण्यात आली होती. यावेळी अपक्ष आणि शिंदे सेनेचे पदाधिकारी आमने सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. अखेर 11 च्या सुमारास येथून बस बाहेर काढण्यात आली. मात्र त्यानंतरही तणाव दिसून आला.दुसरीकडे प्रभाग क्रमांक 1 मध्ये देखील मतपेट्या बंदोबस्त शिवाय नेट असल्याचा व्हिडिओ काहींनी काढला आणि त्याचा जाब देखील विचारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. 

काहींचा मत पेट्या पळवण्याचा प्रयत्न होता, त्याची माहिती मिळाल्यानंतर मी याठिकाणी आले. मतपेट्या घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी काहींनी बाहेरची लोकं बोलवली होती, त्यामुळेच आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला, संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे.मीनाक्षी शिंदे - उमेदवार शिंदे सेना

मतपेट्या उशीर होऊनही गेल्या नव्हत्या,त्या का गेल्या नाहीत त्या पाठवून द्याव्यात यासाठी येथे आलो होतो, आणि प्रशासणाबरोबर चर्चा देखील सुरू होती. मात्र आमच्यावर चुकीचा आरोप लावण्यात आला.मधुकर पावशे - अपक्ष उमेदवार

English
हिंदी सारांश
Web Title : Ballot Box Chaos: Tensions Flare in Thane Post-Election

Web Summary : After Thane elections, ballot box mishandling sparked unrest. In Ward 3, a bus carrying ballot boxes was stopped by Shinde Sena, alleging unauthorized individuals. Tensions rose, requiring police intervention. Ward 1 also saw controversy with unguarded ballot boxes, fueling accusations and disputes.
टॅग्स :Thane Municipal Corporation Electionठाणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Shiv Senaशिवसेना