शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

ठाण्यात कोरोना रुग्णांच्या १२०४ खाटा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 00:40 IST

महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्येच तब्बल ६०१, तर इतर रुग्णालयांच्या मिळून १२०४ खाटा रिकाम्या असून आयसीयूच्यादेखील १२२ खाटा शिल्लक आहेत.

अजित मांडकेठाणे : गेल्या काही दिवसांत ठाण्यात कोरोना रुग्णदरवाढीचा वेग मंदावला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर आले आहे. यामुळे पूर्वी रुग्णालयात खाटा शिल्लक नसल्याची ओरड कमी झाली असून महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्येच तब्बल ६०१, तर इतर रुग्णालयांच्या मिळून १२०४ खाटा रिकाम्या असून आयसीयूच्यादेखील १२२ खाटा शिल्लक आहेत.रविवारपर्यंत ठाणे शहरातील २३ हजार २९५ कोरोनाच्या रुग्णांपैकी ७४५ जणांचा मृत्यू झाला असून त्यावर मात करणाऱ्यांची संख्या २० हजार ८०३, तर प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्यांची संख्या १७४७ एवढी आहे. रुग्ण बरे हाोण्याचे प्रमाणही ९० टक्क्यांवर आले आहे. ठाण्यासाठी समाधानकारक बाब असून यामुळे आता शहरातील कोविड रुग्णालयातील खाटा रिकाम्या राहू लागल्या आहेत. रुग्णदरवाढीचा म्हणजेच डबलिंगचा रेटदेखील ९० दिवसांवर आला आहे.सुरुवातीच्या म्हणजेच मे, जून, जुलैच्या २० दिवसांपर्यंत रुग्णालयात खाटा मिळणे मुश्कील होत होते. परंतु, आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून रुग्णदरवाढही कमी झाली आहे. त्यामुळे विविध रुग्णालयांत १२०४ खाटा शिल्लक असल्याचे पालिकेच्या कोविड डॅशबोर्डवर दिसत आहे. यामध्ये कोविड केअर सेंटरमध्ये ६०१ खाटा शिल्लक आहेत. वास्तविक पाहता हे सेंटर सुरू केल्यानेच बाधितांचे होणारे हालदेखील थांबले आहेत. हे रुग्णालय सुरू होण्यापूर्वी खाटा मिळविण्यासाठी रुग्णंना तारेवरची कसरत करावी लागत होती. परंतु, ती तत्काळ उपलब्ध होत आहे. तसेच आयसीयूच्यादेखील १२२ खाटा शिल्लक आहेत.>क्वारंटाइन सेंटरही होत आहेत रिकामी, ठिकठिकाणी खाटा शिल्लकज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे असतील, अशांना भार्इंदरपाडा आणि होरायझन स्कूलमध्ये देखरेखीखाली ठेवले जात होते. परंतु, आता येथेदेखील खाटा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. भार्इंदरपाडा ७१६ पैकी १९९ खाटा आरक्षित असून ५१७ शिल्लक आहेत. तर, होरायझन स्कूलमध्येही ११५६ पैकी ९५ खाटा आरक्षित असून तब्बल १०६१ खाटा शिल्लक असल्याची माहिती पालिकेच्या कोरोना डॅशबोर्डवर देण्यात आली आहे. याशिवाय, शहरातील काही हॉटेलमध्येही लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी व्यवस्था केली होती. त्यानुसार, येथे २२० खाटा शिल्लक आहेत. तर, मुंब्य्रातील कौसा स्टेडिअममध्ये २०० पैकी ८४ खाटा आरक्षित असून ११६ खाटा शिल्लक आहेत.