शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

हटवलेला रिक्षाथांबा मूळ जागी, संतप्त नागरिकांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:14 IST

बदलापूर पूर्वेतील बेकायदा रिक्षाथांब्याला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हटवल्यानंतर तासाभरातच मुजोर रिक्षाचालकांनी थांब्याचा ताबा घेतला.

बदलापूर - बदलापूर पूर्वेतील बेकायदा रिक्षाथांब्याला मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास हटवल्यानंतर तासाभरातच मुजोर रिक्षाचालकांनी थांब्याचा ताबा घेतला. त्यामुळे संतापलेल्या रेल्वेस्थानक परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत पोलीस, वाहतूक पोलीस आणि रिक्षाचालकांचा निषेध केला. अखेर रिक्षाचालकांनी बंद पुकारत थांबा रिकामा केला. मात्र स्थानक परिसरात तीन ते चार तास तणावाचे वातावरण होते.बदलापूर पूर्वेतील अंबिका हॉटेल आणि संजीवनी सभागृहापर्यंतच्या बेकायदा रिक्षाथांब्याच्या विरूद्ध स्थानक परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर वाहतूक पोलीस, रिक्षा संघटना सावध झाल्या होत्या. वाहतूक पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांनी ठोस निर्णय घेत रिक्षा संघटनांशी चर्चा केली होती. पंधरा दिवसांच्या चर्चेनंतर अखेर मंगळवारी उशिरा स्थानक परिसरातील हा बेकायदा थांबा हटवण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास नगरसेवक संजय भोईर, राजन घोरपडे ाणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांच्या उपस्थितीत रिक्षाथांबा हटवण्यात आला. मात्र काही मोजक्या मुजोर रिक्षाचालकांनी या निर्णयाविरूद्ध रिक्षा बंद करण्याचा प्रयत्न केला. तसेच अवघ्या एका तासातच पूर्वीच्याच ठिकाणी रिक्षा लावण्यास सुरूवात केली. त्यामुळे संतापलेल्या स्थानक परिसरातील नागरिक आणि व्यापाºयांनी रेल्वे स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे सकाळी समन्वयाची भूमिका बजावणाºया पोलिसांची एकच धावपळ सुरू झाली. नगराध्यक्षा विजया राऊत, सहायक पोलीस आयुक्त बाबाजी आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीपकुमार राजभोज यांनी नगरसेवक भोईर यांना सोबत घेऊन चर्चेला सुरूवात केली. मात्र सकाळी झालेला निर्णय पुन्हा कसा बदलू शकतो, असा ठाम पवित्रा घेत भोईर आणि रहिवाशांनी ठिय्या कायम ठेवला. तसेच पोलिसांनी मध्यस्थी करत रिक्षाथांबा हटवल्यानंतर पुन्हा तो तासाभरात कसा येऊ शकतो, असा संताप नागरिकांनी यावेळी व्यक्त केला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने स्थानक परिसरात राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली.प्रवाशांना रिक्षातून उतरवले- दरम्यान, याचकाळात शहरात व्यवसाय करणाºया रिक्षाचालकांना काही मुजोर रिक्षाचालक वाहतूक बंद करण्यासाठी धाक दाखवत होते. त्यामुळे तीनच्या सुमारास शहराच्या पूर्व भागात रिक्षा बंद करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी रिक्षा थांबा हटवण्याच्या आश्वासनानंतर अखेर नागरिकांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.- मात्र रिक्षाथांबा पुन्हा आल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. दरम्यान, या काळात प्रवासी घेऊन जाणाºया रिक्षाचालकांना अडवून प्रवासी उतरवून देण्याचे प्रकार समोर आले.- यामुळे नागरिक संतापले होते. वाहतूक कोंडी आणि मुजोर रिक्षाचालकांचा प्रश्न गंभीर होत असताना तसेच आंदोलन चिघळत असताना तिथे हजर असलेल्या सहायक आयुक्तांनी यावर ठोस निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवली. या विषयावर बोलणे टाळले.

टॅग्स :badlapurबदलापूरnewsबातम्या