शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर पालिका : उपनगराध्यक्षांनी दिला राजीनामा, सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 03:02 IST

कुळगाव-बदलापूर नगराध्यक्षपदाचा सव्वावर्षाचा कालावधी संपल्याने नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाबतंत्राचा वापर सुरू झाला आहे.

बदलापूर - कुळगाव-बदलापूर नगराध्यक्षपदाचा सव्वावर्षाचा कालावधी संपल्याने नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा यासाठी दबाबतंत्राचा वापर सुरू झाला आहे. अडीच वर्षातील कार्यकाळ शिवसेनेतील दोन गटांमध्ये विभागून देण्याबाबत पालकमंत्र्यांकडे चर्चा झाली होती. त्यानुसार नगराध्यक्षांना राजीनाम्याची आठवण करुन देण्यासाठी शिवसेनेचे उपनगराध्यक्ष सुनील भगत यांनी मंगळवारी राजीनामा दिला. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले असले तरी नगराध्यक्षांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यासाठीच ही खेळी शिवसेनेने खेळली असल्याचे बोलले जात आहे.नोव्हेंबर २०१७ मध्ये शिवसेनेने अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांची चाचपणी केली होती. त्यात मोहन राऊत यांच्या पत्नी विजया यांना नगराध्यक्षपद मिळावे यासाठी शिवसेनेच्या एका गटाने पाठपुरावा केला होता. तर शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या गटामार्फत अ‍ॅड. प्रियेश जाधव यांना नगराध्यक्षपद मिळावे यासाठी पाठपुरावा सुरू होता. या दोन गटातील संघर्षामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. अखेर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही गटांची समजूत काढत नगराध्यक्षपद विभागून देण्याबाबत विचार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार विजया राऊत यांना सव्वा वर्ष नगराध्यक्षपद देण्यात आले. तर उर्वरित शेवटचे सव्वा वर्ष शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यावर एकमत झाले. त्यानुसार राऊत यांनी आपला सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला असून आता त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी शिवसेनेच्या दुसºयाने गटाने मोर्चेबांधणी केली आहे. नगराध्यक्ष पदासोबत उपनगराध्यक्षपदही विभागून देण्यात आले होते. आता नगराध्यक्षांना राजीनाम्याची आठवण करुन देण्यासाठी उपनगराध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचे बोलले जात आहे.उपनगराध्यक्ष भगत यांनी पदाचा राजीनामा देताना वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. मात्र हा राजीनामा वैयक्तिक आहे की दबावतंत्र आहे हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र भगत यांचा राजीनामा हा नगराध्यक्षांना राजीनाम्याची आठवण करुन देण्यासाठी दिल्याचे बोलले जात आहे.दुसरीकडे बदलापूरच्या नगराध्यक्ष पदाबाबत संभ्रम असला तरी सव्वा वर्षानंतर नगराध्यक्षांना राजीनामा देऊन दुसºया नगरसेवकाला या पदासाठी संधी मिळण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षांना अजूनही राजीनाम्याबाबत कोणतेही आदेश नाहीत. त्यामुळे पालकमंत्री काय आणि केव्हा आदेश देणार याची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. तर दुसरीकडे राऊत यांनी नगराध्यक्षपदाबाबत बोलतांना पालकमंत्र्यांकडून जो आदेश येईल त्या आदेशाचे पालन केले जाईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे आता नगराध्यक्षपदाचा विषय हा पालकमंंत्र्यांच्या दरबारात सुटणार हे स्पष्ट झाले आहे.आदेशाचे पालनया संदर्भात शहराध्यक्ष वामन म्हात्रे यांनीही राजीनाम्याबाबत आपली प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसारच काम केले जाईल. जो आदेश येणार त्याचे पालन करण्याची जबाबदारी आपण सांभाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पालकमंत्री कुठला आदेश देतात याकडे येथील स्थानिक शिवसेना पदाधिकाºयांचे लक्ष लागलेले आहे.

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणे