शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर नगराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा, निवडणूक घेण्यास आयोगाची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 03:25 IST

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन २० दिवस उलटले, तरी अजूनही या पदासाठी निवडणूक जाहीर झालेली नाही.

बदलापूर - कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन २० दिवस उलटले, तरी अजूनही या पदासाठी निवडणूक जाहीर झालेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात अभिप्राय मागवल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक कायद्याच्या कचाट्यात सापडली होती. अभिप्रायामध्ये निवडणूक आयोगाने नियमानुसार निवडणूक घेण्यास हरकत नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आठवडाभरात नगराध्यक्षपदाची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.बदलापूरच्या नगराध्यक्ष विजया राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक घेणे गरजेचे होते.जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात अधिकार असल्याने लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधीच ही निवडणूक प्रक्रिया पार पडण्याची शक्यता होती. मात्र, जिल्हाधिका-यांनी या निवडणुकीसंदर्भात उल्हासनगर उपविभागीय अधिकाºयांवर जबाबदारी सोपवत त्यांना निवडणुकीचा कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले होते.मात्र, नगराध्यक्षपदाची निवडणूक लागण्याआधीच लोकसभेची निवडणूक आचारसंहिता लागल्याने पुन्हा नवा पेच निर्माण झाला आहे.आचारसंहितेच्या काळात नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून अभिप्राय मागवण्यात आला होता. निवडणूक आयोगाने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आचारसंहितेचा अडथळा नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नियमानुसार जिल्हाधिकाºयांना निवडणुका घेण्याचे अधिकारदिले.त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आचारसंहितेची कोणतीच अडचण राहिलेली नाही. त्यामुळे येत्या आठवडाभरात ही निवडणूक जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे कुणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.याचिकेवर निर्णय अवलंबून नाही२७ किंवा २८ मार्चला ही निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आचारसंहितेचा अडथळाच दूर झाल्याने आता उच्च न्यायालयातील याचिकेवर कोणताच निर्णय अवलंबून नसल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणे