शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूर-कर्जत चौपदरीकरण; केंद्राने २ मार्गांना दिली मंजुरी; कल्याण-बदलापूर मार्गिकेचे काम ३० टक्के पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 06:29 IST

केंद्र सरकारने बदलापूर ते कर्जत दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली. या प्रकल्पावर १३२४ कोटी रुपये खर्च येणार आहे

मुंबई : रेल्वे प्रवासातील गर्दीची समस्या कमी करण्यासाठी महत्त्वाच्या कल्याण-बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या प्रकल्पाचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. तर बदलापूर ते बदलापूर-कर्जत दरम्यान ३२ किमीची तिसरी आणि चौथी मार्गिका उभारण्याच्या महत्त्वाच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने बुधवारी मंजुरी दिली आहे.

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून एमयुटीपी ३ ए अंतर्गत कल्याण-बदलापूर प्रकल्पाचे काम सुरू आहे. यात अस्तित्त्वात असलेल्या दुहेरी मार्गासोबत दोन नवे मार्ग तयार केले जात आहेत. यामुळे मोक्याच्या वेळांत लोकलच्या वाढीव फेऱ्या चालवणे शक्य होणार आहे. या मार्गिकेचे चौपदरीकरण झाल्यानंतर कल्याण-कर्जत संपूर्ण पट्ट्यावर उपनगरीय वाहतूक मोठ्या प्रमाणात सुलभ होणार आहे. केंद्र सरकारने बदलापूर ते कर्जत दरम्यान रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका तयार करण्याच्या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली. या प्रकल्पावर १३२४ कोटी रुपये खर्च येणार आहे. यातील ५० टक्के खर्च महाराष्ट्र सरकार करणार आहे.

लवकरच निविदा प्रक्रियाएमआरव्हीसीने दिलेल्या माहितीनुसार, मंजुरीनंतर बदलापूर-कर्जत प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार असून, पुढील काही महिन्यांत प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. या दोन प्रकल्पांमुळे कल्याण-कर्जत मार्गावरील प्रवासी क्षमतेत वाढ होऊन प्रवाशांना अधिक फेऱ्या आणि वेळापत्रकातील नियमितता अनुभवायला मिळणार आहे.

कल्याण-बदलापूर चौपदरीकरणाची प्रगतीविठ्ठलवाडी, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे प्लॅटफॉर्म विस्तारीकरण पूर्ण.सिग्नलिंग इमारती उल्हासनगर व अंबरनाथ येथे अंतिम टप्प्यात.रेल्वे कर्मचारी निवासासाठी सहा मजली इमारतींच्या कास्टिंगल प्रगतीपथावर. प्रकल्पातील पूल - २१ पूल पूर्ण.स्टेशन विकास (चिकलोली) - स्टेशन इमारतीचा पहिल्या मजल्याचा स्लॅब पूर्ण.विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, चिकलोली आणि बदलापूर या पाचही स्थानकांचा आराखडा मंजूरप्रकल्पाची एकूण किंमत - १५१० कोटीप्रकल्पाची लांबी - १४ किमी

English
हिंदी सारांश
Web Title : Badlapur-Karjat Rail Expansion Approved; Kalyan-Badlapur Line 30% Complete

Web Summary : Central government approved the Badlapur-Karjat third and fourth railway lines, costing ₹1324 crore, with Maharashtra covering 50%. Kalyan-Badlapur quadrupling is 30% complete, improving suburban connectivity. Tenders are pending.
टॅग्स :railwayरेल्वे