शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सात कोटींच्या दुरुस्ती नंतरही भिवंडीतील चिंचोटी-अंजुरफाटा-मानकोली रस्त्याची दुरावस्था 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 18:50 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष. वाहन चालकांना करावा लागतोय जीव मुठीत धरून प्रवास.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष.वाहन चालकांना करावा लागतोय जीव मुठीत धरून प्रवास.

नितीन पंडीत

भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा ते चिंचोटी महामार्गाची पहिल्याच पावसाळ्यात दुरावस्था झाल्याने पुन्हा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गाच्या दुरावस्थेकडे टोल वसुली करणाऱ्या कंपनीचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेत नागरिकांची हि समस्या येत नसल्याने टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीबरोबरच शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागा विरोधात नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्ती व सुधारणेसाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येत संघर्ष समिती स्थापन करून अनेक वेळा रास्ता रोको आंदोलने केले होते. अखेर राज्य शासनाने टोल कंपनीच्या अनामत रक्कमेतून तब्बल सात कोटी रुपयांचा निधी मागील वर्षी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर केला होता. मात्र दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराने थातूरमातूर दुरुस्ती केल्याने बुधवारी व गुरुवारी पहिल्याच पावसात रस्ता दुरुस्तीचे पितळ उघडे पडले आहे. गटर व्यवस्थापनेचे कोणतेही काम व्यवस्थित केले नसल्याने य महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. तर मानकोली ते अंजुरफाटा पर्यंतच्यारस्त्यावर वळ पाडा येथे रस्त्याची अक्षरश: दुरावस्था झाली आहे. त्याचबरोबर अंजुरफाटा ते खारबाव पर्यंतच्या रस्त्यामध्ये देखील ठिकठिकाणी पाणी साचले होते व या पाण्यामुळे ठिकठिकाणी महामार्गावर खड्डे पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याची दुरुस्ती एका खासगी ठेकेदाराकडून करण्यात आली होती. या ठेकेदाराने रस्त्याची नेमकी कशी दुरुस्ती केली हे या पावसाळ्यात समोर येत असून भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे या रस्त्यावर नागरिकांचा अपघात होऊन जीव जाण्याची शक्यता दक्ष नागरिक व्यक्त करीत असून जर अपघातात नागरिकांचा जीव गेल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत असून खासगी ठेकेदाराने केलेल्या कामाची तपासणी व निरिक्षण लवकरात लवकर करण्यात यावे व यात भ्रष्टाचार अथवा दुर्लक्ष आढळून आल्यास संबंधित ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.  

टॅग्स :bhiwandiभिवंडीroad transportरस्ते वाहतूकRainपाऊसthaneठाणे