शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
3
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
4
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
5
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
6
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
7
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
8
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
9
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
10
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
11
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
12
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
13
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
14
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
15
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
16
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
17
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
18
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
19
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर

६० उद्योगांचे भूखंड घेतले परत

By admin | Updated: November 19, 2015 01:53 IST

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाक डून (एमआयडीसी) अत्यल्प दरात भूखंड मिळवून वर्षानवर्षे त्यावर उद्योग सुरू न करणाऱ्या ठाणे, पालघर जिल्ह्यांसह मुंबईतील

- पंकज रोडेकर,  ठाणेमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाक डून (एमआयडीसी) अत्यल्प दरात भूखंड मिळवून वर्षानवर्षे त्यावर उद्योग सुरू न करणाऱ्या ठाणे, पालघर जिल्ह्यांसह मुंबईतील २३९ भूखंडधारकांना ठाणे एमआयडीसीने नोटीसा बजावल्या आहेत. ६० जणांकडून भूखंड परत घेतले आहेत. यापैकी काही भूखंडधारकांनी या निर्णयाविरोधात न्यायालयाचे दार ठोठावले आहे. केंद्रात भाजपा सरकार आल्यावर सुरू झालेल्या ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने ‘मेक इन महाराष्ट्र’ योजना राबवण्याचे ठरवले. यासाठी मोठ्या प्रमाणात औद्योगिक भूखंडाची गरज आहे. आतापर्यंत एमआयडीने रस्ते, पाणी पुरवठा, वीज आदी सुविधा देऊन औद्योगिक भूखंड विकसित करून उद्योगांना बाजारभावाच्या तुलनेत कमी किमतीत दिले. त्यामुळे हे भूखंड मिळवण्यासाठी स्पर्धा होती. मात्र, अनेकजण स्वस्तात भूखंड घेऊन वर्षानुवर्षे उद्योगच उभारत नाहीत. परिणामी एमआयडीसीचा हेतू असफल ठरतो व रोजगार निर्मितीला खीळ बसते. एमआयडीसीच्या सर्वेक्षणात ठाणे, पालघर या जिल्ह्यांसह मुंबईतील मरोळ या ठाणे प्रादेशिक प्राधिकरण १ आणि २ कार्यक्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रात २३९ भूखंड हे वापराविना पडून असल्याचे आढळले. यामध्ये मीरा रोड औद्योगिक क्षेत्रात एकही भूखंड वापराविना नाही तर सर्वाधिक ७२ भूखंड डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात वापराविना पडून आहेत. त्यापाठोपाठ तारापूरचा नंबर लागतो.तारापूरचे ८ भूखंड ताब्यातसर्वाधिक ८ भूखंड तारापूर औद्योगिक क्षेत्रातून ताब्यात घेतले आहेत. त्यापाठोपाठ कल्याण-भिवंडीत ७ भूखंड ताब्यात घेतले आहेत. इतर भूखंडधारकांकडून एमआयडीसीच्या नोटिसला उत्तर देण्याची प्रक्रिया सुरू आहे. समाधानकारक कारण न आढळल्यास ते देखील परत घेतले जाणार आहेत. काही भूखंडधारकांनी या कारवाईच्या विरोधात न्यायालयाचे दार ठोठावल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे विभाग १ या कार्यक्षेत्रात तारापूर, ठाणे (वागळे), मरोळ, मिरा, आणि डोंबिवली तर २ या कार्यक्षेत्रात अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड आणि अतिरिक्त मुरबाड, कल्याण-भिवंडी व अतिरिक्त कल्याण-भिवंडी हा औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे. कारवाईची आकडेवारीऔद्योगिक क्षेत्रनोटिसा परतबजावलेले घेतलेले भूखंडभूखंडतारापूर४००८ठाणे३८०६मरोळ१६०१मीरा ००००डोंबिवली७२०६अंबरनाथ०५००अति.अंबरनाथ०७०२बदलापूर०७०१मुरबाड आणि अति.मुरबाड४७२९कल्याण-भिवंडी००००अति.कल्याण-भिवंडी०७०७एकूण२३९६०