शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित, बालरंगभूमीकडे सरकारनेही विशेष लक्ष दिले पाहिजे : समेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 17:23 IST

ठाणे : गंधार कलासंस्थेच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा गंधार गौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की ...

ठळक मुद्देज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ गंधार गौरव पुरस्काराने सन्मानितबालरंगभूमीकडे सरकारनेही विशेष लक्ष दिले पाहिजे : समेळपत्की यांचाही सत्कार

ठाणे : गंधार कलासंस्थेच्यावतीने देण्यात येणारा यंदाचा गंधार गौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले. या पुरस्काराला उत्तर देताना समेळ म्हणाले की, अ. भा. मराठी नाट्यपरिषद आजही बालरंगभूमीकडे गांभीर्याने पाहत नाही. बालरंगभूमीकडे सरकारनेही विशेष लक्ष दिले पाहिजे. जोपर्यंत बालरंगभूमी सशक्त होणार नाही तोपर्यंत मराठी रंगभूमीला उत्तम दिवस येणार नाहीत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.  तसेच, यावेळी पत्की यांचाही सत्कार करण्यात आला. गुरूवारी बालदिनानिमित्त या सोहळ््याचे गडकरी रंगायतन येथे आयोजन केले होते. दरवर्षी बालरंगभूमीच्या विशेष योगदानाबद्दल एका ज्येष्ठ रंगकर्मींचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येतो. याआधी रत्नाकर मतकरी, विद्याताई पटवर्धन आणि दिलीप प्रभावळकर यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यावर्षी हा पुरस्कार समेळ यांना देण्यात आला. समेळ यावेळी पुढे म्हणाले की, मी बालनाटकातूनच मोठा होत गेलो. हा पुरस्कार माझ्यासाठी घरचा सत्कार आहे. बालरंगभूमी सशक्त झाल्यास आम्ही मराठी रंगभूमीचा पाहिलेला सुवर्णयोग पुन्हा येईल अशी आशा व्यक्त केली. ज्येष्ठ कवी अशोक बागवे म्हणाले की, ठाणे ही उपराजधानी नसून ती सांस्कृतिक राजधानीच आहे. हे श्रीस्थानक सर्व कलांचे स्थानक आहे. इथे सर्व कला एकत्र नांदतात असे ते म्हणाले. ठाणे ही कलावंताची राजधानी असली पाहिजे आणि याचा वटवृक्ष आम्ही करणार असल्याचे आश्वासन आ. निरंजन डावखरे यांनी यावेळी दिले. आ. केळकर म्हणाले की, समेळ यांचे रंगभूमीला मोठे योगदान आहे. ते नॉन स्टॉप काम करतात. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे अशी आशा त्यांनी व्यक्त केली. केळकर पुढे म्हणाले, ठाणे ही महाराष्ट्राची राजधानीच आहे. कारण इथे एकही दिवस असा जात नाही की, कोणती कला सादर झाली नाही. पुढच्या काळात रंगभूमीला समृद्ध करण्यासाठी बालरंगभूमीला खतपाणी दिले पाहिजे तरच अधिक सुवर्ण काळ निर्माण होईल. दरम्यान, पत्की यांच्या झिंगल्ससवर गंधारच्या बालकलाकारांनी सादरीकरण करुन मान्यवरांबरोबर उपस्थितांची दाद मिळवली. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ क्रि केटर सुलक्षण कुलकर्णी, दिग्दर्शक विजू माने, अभिनेते सागर तळाशिकर, केबीपी महाविद्यालयाचे सचिन मोरे, गंधारचे प्रा. मंदार टिल्लू, बाळकृष्ण ओडेकर आदी उपस्थित होते. यावेळी बालरंगभूमीसाठी कार्यरत असणाऱ्या प्रेरणा या संस्थेला गौरविण्यात आले. या संस्थेच्या वतीने अशोक पावसकर, चित्रा पावसकर या दाम्पत्याला गौरविण्यात आले. तसेच, प्रकाश निमकर, राजेश उके या परिक्षकांचा, सूर नवा ध्यास नवा मध्ये चमकलेल्या सई जोशी या तिघांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.------------------------------गंधारतर्फे निवडण्यात आलेल्या नाटकांना यावेळी गौरविण्यात आले.े*सर्वोत्कृष्ट बालनाट्यसेक्र ेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर

----------------------------------------------------------*सर्वोत्कृष्ट नेपथ्यमाणिक खटिंग/ उमेश गोडसे-मॅडम-पुणे----------------------------------------------------------*सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाएम. बी. एन्टरटेनमेंट-कल्याण-अल्लादीन आणि जादुई जीन-चेतन पडवळ

----------------------------------------------------------*सर्वोत्कृष्ट रंगभूषासेक्र ेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-अनिकेत काळोखे

----------------------------------------------------------*सर्वोत्कृष्ट वेशभूषाअश्वमेध नाट्यसंस्था-कल्याण-आदिंबाच्या बेटावर-रश्मी घुले आणि पालकवर्ग

----------------------------------------------------------*सर्वोत्कृष्ट पाशर््वसंगीतनाट्यसंस्कार कला अकादमी-पुणे-नाच रे मोरा-आनंद देशमुख

----------------------------------------------------------*सर्वोत्कृष्ट लेखकराजयोग-कल्याण-राखेतून उडाला मोर-डॉ. सतिश साळुंखे---------------------------------------------------------*सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकसेक्र ेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-सुरेश शेलार----------------------------------------------------------

*सर्वोत्कृष्ट बालकलाकार मुलगासेक्र ेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-हर्ष काटे

----------------------------------------------------------*सर्वोत्कृष्ट बालकलाकार मुलगीसेक्र ेड हार्टचे थिएटर आॅफ इनोव्हेशन-कल्याण-एक था टायगर-अपुर्वा पडवळ

टॅग्स :thaneठाणेchildren's dayबालदिनTheatreनाटक