शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचे अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी; ठाणे पोलिसांनी बजावली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 07:15 IST

मुंब्रा परिसरात रमजानच्या महिन्यांमध्ये मनसेच्या या भूमिकेमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी लागू करणारे आदेश पोलिसांनी जारी केले. मुंब्रादेवी डोंगरावरील अनधिकृत मशीद आणि मजार पुढील १५ दिवसांत हटवली नाही तर त्याच जागेवर मंदिर बांधू, असा इशारा मनसेने दिला होता. त्यामुळे ठाणे पोलिसांनी जाधव यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी लागू करताना त्या परिसरात १४४ कलम लागू केले.

मुंब्रा परिसरात रमजानच्या महिन्यांमध्ये मनसेच्या या भूमिकेमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. गेल्या दोन दिवसांपासून मुंब्रा पोलिस ठाण्याच्या आसपास  मोठ्या प्रमाणात जमाव जमत होता. रमजानचा महिना सुरू असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस आणि प्रशासन यांनी खबरदारी घेत जाधव यांना  मुंब्रा भागात प्रवेशबंदीची नोटीस बजावली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त दादर शिवाजी पार्क येथील मेळाव्यात माहीम येथील खाडीतील बेकायदा दर्ग्याबाबत आवाज उठवला. तेथील बेकायदा बांधकामांची छायाचित्रे जाहीर केली. त्यानंतर पालिका व पोलिसांनी बेकायदा बांधकाम पाडले. त्याचवेळी मुंब्र्यातील अनधिकृत मशीद व मजार याच्यावर कारवाईचा इशारा ठाण्यातील मनसेने दिला होता. 

टॅग्स :Avinash Jadhavअविनाश जाधवMNSमनसेmumbraमुंब्राthaneठाणे