शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

कल्याणच्या बी.के.बिर्ला महाविद्यालयाला ‘स्वायत्त दर्जा’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 15:38 IST

स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याने आता कौशल्याधारीत आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याची मुभा प्राप्त झाली आहे.

कल्याण - आपल्या दर्जेदार शिक्षण आणि चमकदार कामगिरीमूळे नेहमीच अग्रेसर असलेल्या कल्याणच्या बी.के.बिर्ला महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रातील मानाचा असा ‘स्वायत्त दर्जा’ मिळवला आहे. त्यामूळे मुंबई विद्यापीठाच्या स्वायत्त महाविद्यालयांच्या यादीमध्ये आता बिर्ला महाविद्यालयाचाही समावेश झाला आहे. बिर्ला महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ओ. आर.चितलांगे यांनी गुरुवारी एका पत्रकार परिषदेत ही माहीती दिली.

मुंबई विद्यापीठांतर्गत आतापर्यंत असणाऱ्या केवळ 12 महाविद्यालयांनाच हा दर्जा देण्यात आला आहे. स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्याने आता कौशल्याधारीत आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याची मुभा प्राप्त झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच फोटोग्राफी आणि अॅनिमेशन हे दोन कोर्स सुरू केले जाणार आहेत. तसेच परीक्षांसाठीचे पेपर बनवण्याचे आणि निकाल जाहीर करण्याचे अधिकारही बिर्ला महाविद्यालयाला प्राप्त झाले आहेत. तर इथेच आम्ही थांबणार नसून विद्यापीठाच्या दर्जासाठी आमचा पुढचा प्रवास आणि प्रयत्न सुरू झाल्याचेही चितलांगे यांनी सांगितले.

स्वायत्त दर्जानंतर महाविद्यालयाच्या फी मध्ये आणि प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचे बदल करण्याचे अधिकार मात्र महाविद्यालयाला नाहीत. शासनाच्या नियमानुसारच ते निश्चित होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला सुबोध दवे, डॉ. अशोक प्रधान, डॉ. नरेश चंद्र, गीता उन्नीकृष्णन, डॉ. स्वप्ना समेळ, अविनाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :collegeमहाविद्यालयkalyanकल्याण